महाराष्ट्र विद्यालय पिंपळगाव भोसले येथील विद्यार्थिनी कुमारी हिमानी श्रीकृष्ण मिसार चित्रकला स्पर्धेत प्रथम.

महाराष्ट्र विद्यालय पिंपळगाव भोसले येथील विद्यार्थिनी कुमारी हिमानी श्रीकृष्ण मिसार चित्रकला स्पर्धेत प्रथम.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक 


ब्रह्मपुरी : दिनांक,१२ /०७/२२०४ प्रादेशिक परिवहन कार्यालय चंद्रपूर द्वारा आयोजित रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेत महाराष्ट्र विद्यालय पिंपळगाव भोसले तालुका ब्रह्मपुरी येथील विद्यार्थिनी कुमारी हिमानी श्रीकृष्ण मिसार वर्ग ९ आणि भविष्य सुरेश गोन्नाडे वर्ग १० याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला.


सदर दोन्ही विद्यार्थ्यांना चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौंडा यांच्या शुभ हस्ते विवेक जॉन्सन मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर , मुमक्का सुदर्शन जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शील व प्रशस्तिपत्र पत्र देऊन गौरविण्यात आले.पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक ओम प्रकाश वाघमारे तथा सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !