जि.प.प्रा.शाळा जांब रयतवारी येथे शिक्षकांच्या नियुक्तीसाठी पालकांनी ठोकले टाळे.
एस.के.24 तास
सावली : दिनांक 1/07/2024 ला शालेय शैक्षणिक सत्र सुरू झाले असता जि.प.प्राथ.शाळा रैतवारी ता,सावली जिल्हा, चंद्रपूर बयेथे गेल्या मागील वर्षापासून शाळेला एकच वर्ग शिक्षक आहे.
या शैक्षणिक वर्षातील शाळेचा पहिला दिवस भरविण्यात आला असून या वर्षी सुद्धा एक च वर्ग शिक्षक असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.याची बाब लक्षात घेता शाळेला नवीन सहकारी वर्गशिक्षक जो पर्यंत मिळत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय पालक वर्गानी घेतली आहे.
पालक वर्गाने शाळेला कुलूप ठोकून शाळा बंद करून ठेवण्याचा निर्णय घेतला. व आज शाळेचा कुलूप लावण्यात आले.वर्ग १ते ४ ला एकच वर्ग शिक्षक असल्यामुळे हा निर्णय गावकऱ्यांनी घेतला.