7 जुलै ला भारतीय बेरोजगार विद्यार्थी मोर्चाचे प्रशिक्षण.

7 जुलै ला भारतीय बेरोजगार विद्यार्थी मोर्चाचे प्रशिक्षण.


मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक


गडचिरोली : भारतीय विद्यार्थी मोर्चा व भारतीय बेरोजगार मोर्चा च्या वतीने जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर ७ जुलै रविवारला सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. 


हे प्रशिक्षण शिबिर इंजिनिअर,सुनील दुर्गे यांचे घरी सृष्टी सिलेब्रेशन सभागृह जवळ नवेगाव कॉम्प्लेक्स गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले आहे. भारतात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे. त्यांच्या समस्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात  वाढत आहेत.त्यावर योग्य उपाय प्राध्यापक स्वप्निल धुर्के हे आपल्या मार्गदर्शनातुन करणार आहेत. 


याचा लाभ जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण पिढीने घ्यावे असे भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने कळविण्यात येत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !