सिंदेवाही तालुक्यातील मोहळी गावात दोन बछड्यांसह मादी बिबटचा गावात धुमाकूळ ; 6 जण गंभीर जखमी.

सिंदेवाही तालुक्यातील मोहळी गावात दोन बछड्यांसह मादी बिबटचा गावात धुमाकूळ ; 6 जण गंभीर जखमी.


एस.के.24 तास


सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील मोहाळी गावात घुसून दोन बछड्यांसह मादी बिबट्याने धुमाकूळ घालत कहर केला आहे.बछड्यांसह मादी बिबट्याने गावातील सहा जणांवर हल्ला करून जखमी केले आहे. 


त्यानंतर शानबा बारेकर यांच्या घरात ठाण मांडले होते. दरम्यान वनविभागाच्या बचाव पथकाने बारेकार यांच्या घरात ठाण मांडलेल्या मादी बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले असून दोन बछड्यांना जेरबंद करण्यासाठी वनविभाग शर्थीचे प्रयत्न करीत आहे. 


जखमी मध्ये विजय देवगिरीकर वय,35 वर्ष,मनोहर दांडेकर वय,50 वर्ष,जितेंद्र दांडेकर वय,30 वर्ष, सुभाष दांडेकर वय,25 वर्ष, रितीक वाघमारे,18 वर्ष, पांडूरंग नन्नावारे वय,32 वर्ष यांचा समावेश आहे.


मोहाळी गावात दोन बछड्यांसह आलेल्या मादी बिबटने कहर केला. ही मादी बिबट बछड्यांसह शुक्रवारी सकाळी 6.00.वा.च्या सुमारास गावात शिरले.या तिघांनीही चांगला धुमाकूळ घातला. यामध्ये सहा जणांना जखमी करून गावातील शानबा बारेकर यांच्या घरात आश्रय घेतला. ही बाब माहिती होताच गावकऱ्यांनी एकच गर्दी केली आहे.


घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वन विभागाचे अधिकारी बचाव पथकास मादी बिबट व तिच्या बछड्यांना रेस्क्यू करण्यासाठी दाखल झाले होते. शानबा बारेकर यांच्या घरात दडून बसलेल्या बिबट्याला वनविभागाच्या बचाव पथकाने रेस्स्कू करून सुखरूप जेरबंद केले आहे. मादी बिबट्याच्या दोन बछड्यांना पकडण्यासाठी वनविभागाचे पथक तारेवरची कसरत करीत होते.


वृत्त लिहेत्तोवर बछड्यांना जेरबंद करण्यात आले नव्हते. यादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सिंदेवाही पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. जखमींना सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


बिबट व वाघांचे हल्ले या भागात वाढल्याने जंगलगतच्या गावांमध्ये दहशत आहे. मानव – वन्य जीव संघर्षामुळे परिसरातील नागरिकांनी वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. जिल्ह्यात सध्या पेरणीचा हंगाम सुरू आहे.


शेतकरी भाताच्या पेरणीसाठी शेतात जातात. नेमका त्याच वेळी वाघ हल्ला करतात.अशा वेळी अनुचित घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता वाघाचा बंदोबस्त करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !