पोंभुर्णा तालुक्यातील सातारा कोमटी या गावी ओ.बी.सी.बांधवांना 5 ऑगस्ट रोजी चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या मंडल यात्रेचे स्वागत करावे. - डॉ.संजय घाटे
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक
राजेंद्र वाढई - उपसंपादक
पोंभुर्णा : पोंभुर्णा तालुक्यातील सातारा कोमटी या गावी ओबीसी बांधवांना 5 ऑगस्ट रोजी चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या मंडल यात्रेनिमित्त तसेच ऑगस्ट महिन्यात 24,25 रोजी होणाऱ्या भारतीय ओबीसी महापरिषदेनिमित्त आढावा बैठकित मार्गदर्शन केले.
5 ऑगस्ट रोजी चंद्रपूर जिल्ह्यात मंडल यात्रेचे आगमन होत आहे. प्रत्येक ओबीसी बांधवांने भगिनीने स्वागताची तयारी ठेवावी तसेच भारतीय ओबीसी महापरिषदेला प्रत्येक ओबीसी बंधू भगिनींनी उपस्थित राहणे गरजेचे असल्याचे बहुजन समता पर्वाचे व भारतीय ओबीसी महापरिषदेचे अध्यक्ष,डॉक्टर,संजय घाटे यांनी सांगितले.
याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित ओबीसी महापरिषदेचे पोंभुर्णा तालुका अध्यक्ष राहुल सोमनकर.संघटक भुजंग भाऊ ढोले, स्थानिक ठाकरेजी तसेच सामाजिक कार्यकर्ते योगेश निकोडे व प्रशांत ठाकरे व इतर समाज बांधव उपस्थित होते.