धानोरा तालुक्यातील झाडापापडा ग्रा.पं.अतंर्गत रोपिनगट्टा गावात ; पाहुण्यांना वाढदिवसाच्या कार्यक्रमात पाहुनचार देतांना 28 लोकांना विषबाधा.

धानोरा तालुक्यातील झाडापापडा ग्रा.पं.अतंर्गत रोपिनगट्टा गावात ; पाहुण्यांना वाढदिवसाच्या कार्यक्रमात पाहुनचार देतांना 28 लोकांना विषबाधा.


 मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक


धानोरा :  गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकाला असलेले व छत्तीसगड सिमेला लागुन असलेला झाडापापडा ग्रामपंचायत अतंर्गत रोपिनगट्टा गावात एका मुलांच्या बारशाच्या कार्यक्रमातील जेवणात 28 लोकांना विषबाधा झाल्याची घटना दि. ४ जुलै रोजी सायंकाळी घडली. 


रोपीनगट्टा गावातील सुरगु मुरा टेकाम यांच्या नातवाच्या बारशाच्या कार्यक्रमात जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता.पाहुणे आणि गावातील काही मंडळी पहिल्याच पगंतीत जेवण झाले तेव्हा जेवणानंतर लगेचच काही लोकांना उलट्या,मळमळ होवू लागल्या.


जवळपास 28 लोकांना विषबाधा निर्माण झाल्यामुळे सर्तकता बाळगुन काहीना पांकाजुर (छत्तीसगड)तर काहींना सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भरती करण्यात आले.सध्या त्यांची प्रकृती ठिक असुन विषबाधा कश्यामुळे झाला हे कळू शकले नाही.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !