20 ते 30 तरूणींना वेश्या व्यवसायात आणून पैसे कमविणारी महिलेला अटक या शहरात खळबळ.

20 ते 30 तरूणींना वेश्या व्यवसायात आणून पैसे कमविणारी महिलेला अटक या शहरात खळबळ.


एस.के.24 तास 


मुंबई : २० ते ३० वयोगटातील तरूणींना विविध ठिकाणी काम देण्याचे आमिष दाखवून इतर शहरांमधून कल्याणमध्ये आणायचे. त्यांना जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडून त्या माध्यमातून पैसे कमविणाऱ्या एका महिलेला खडकपाडा पोलिसांनी मोठ्या शिताफिने अटक केली आहे.


अनामिका राजू छत्री वय,22 वर्ष रा.मातोश्री इमारत, वर्सोवा मंदिर समोर, अंधेरी) असे आरोपी महिलेचे नाव आहे. ती मुळची आसाम गुवाहाटी भागातील रहिवासी आहे. कल्याण पश्चिमेतील हॉटेल गुरुदेव ॲनेक्स परिसरात या महिलेला अटक करण्यात आली आहे. एक महिला तरूणींना वेश्या व्यवसायात ओढून त्या माध्यमातून पैसे कमवित आहे आणि पीडित तरूणींची फसवणूक करत आहे, अशी माहिती खडकपाडा पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलीस या महिलेच्या हालचालींवर लक्ष ठेऊन होते.


गेल्या आठवड्यात शुक्रवारी संध्याकाळच्या वेळेत आरोपी अनामिका राजू हिने उल्हासनगर भागातून एक गरजू तरूणीला पैशाचे आमिष दाखवून सोबत घेतले. नंतर तिला कल्याण येथे आणून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले.अशाप्रकारे अनामिक दररोज अनेक मुलींची फसवणूक करत असल्याच्या गुप्त तक्रारी खडकपाडा पोलिसांना प्राप्त होत होत्या. त्यामुळे पोलीस या महिलेच्या मागावर होते.


शुक्रवारी अनामिक कल्याण-खडकपाडा रस्त्यावर एका तरूणीला वेश्या व्यवसायासाठी घेऊन येणार आहे अशी माहिती मिळताच खडकपाडा पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धनजय मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या भागात सापळा लावला. त्यावेळी अनामिका, पीडित तरूणी आणि एक ग्राहक असे एकत्रितरित्या पोलिसांना दिसले. 


या कारवाईत पोलिसांनी अनामिका राजू हिला अटक केली. तिच्याकडे ग्राहकांकडून मिळालेले पैसे आढळून आले. अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याने तिच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !