नागभीड तालुक्यात पूर पाहण्यासाठी गेलेल्या 2 व्यक्ती चा पुरात पाय घसरून गेल्याने मृत्यू ; एकाचा मृतदेह सापडला तर दुसऱ्याचा शोध सुरू.
एस.के.24 तास
नागभीड : तालुक्यात पुर पाहण्यासाठी गेलेल्या दोन व्यक्ती पुरात वाहून गेल्यात त्यातील एकाचा मृतदेह हाती लागला तर दुसऱ्याची शोधमोहीम सुरू आहे.या दोन घटना वेगवेगळ्या गावातील असल्या तरी एकाच नाल्यावरील आहेत.
पहिली घटना विलम येथे घडली. विलम येथील ऋणाल प्रमोद बावणे वय,11 वर्ष हा मुलगा सकाळी 11.30. वा.च्या सुमारास गावातील इतर मुलांसोबत गावाजवळच्या नाल्यावर पूर बघण्यासाठी गेला होता. तेव्हा या नाल्यावर वर्दळ सुरू असल्याने हा मुलगाही नाला पार करीत असताना पाण्यात त्याचा पाय घसरला आणि पाण्याच्या प्रवाहात तो वाहून गेला.आजुबाजूला असलेल्या लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण तो असफल झाला.
दुसऱ्या घटनेत बोथली येथील,स्वप्नील हेमराज दोनोडे वय,30 वर्ष हा तरुणही गावा जवळून वाहणाऱ्या नाल्यावर पूर बघण्यासाठीच गेला होता.त्याचाही पाय घसरला आणि वाहून गेला.मात्र काही अंतरावर चिखल असल्याने तो चिखलात फसला.उपस्थित नागरिकांनी हालचाल करून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण तोवर त्याचा मृत्यू झाला होता.