रिल्सच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर आदळली ; 2 जण जागीच ठार 3 जण गंभीर जखमी. ★ मृतकामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील आदित्य पुण्यपवार युवकाचा समावेश.


रिल्सच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर आदळली ; 2 जण जागीच ठार 3 जण गंभीर जखमी.


मृतकामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील आदित्य पुण्यपवार युवकाचा समावेश.


सुरेश कन्नमवार !मुख्य संपादक!एस.के.24 तास 


नागपूर : पार्टी केल्यानंतर कारने फेरफटका मारण्यासाठी निघालेल्या पाच मित्रांनी इंस्टाग्रामवर रिल्स बनवणे सुरू केले. रिल्सच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर आदळली. कार वेगात असल्यामुळे ८ ते १० वेळा उलटली. यात चालकासह दोघांचा मृत्यू झाला तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. 


हा अपघात मंगळवारी पहाटे तीन वाजता पांजरा येथील बीएसएनएलच्या कार्यालयाजवळ झाला. विक्रम गादे वय,२० वर्ष महादुला) आणि आदित्य पुण्यपवार वय २०  वर्ष चार्मोशी,गडचिरोली) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. जखमींमध्ये जय संजय भोंगाडे, सुजल प्रमोद चव्हाण, सुजय राजन मानवटकर (सर्व राहणार महादुला, कोराडी) यांचा समावेश आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, विक्रम गादे याच्या घरी पार्टी आयोजित करण्यात आली होती. पाचही जणांनी जेवण केल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास फेरफटका मारण्यासाठी कार बाहेर काढली. रात्री अडीचच्या सुमारास पाचही मित्र कारने महादूल्याकडून नागपूरच्या दिशेने निघाले.


गाडीत एक मित्र इंस्टाग्रामवर रिल्स बनवायला लागला. वेगाशी स्पर्धा करणाऱ्या कारमध्ये रिल्स बनविताना चालकानेही सहभाग घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, यादरम्यान कारवरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर आदळली. हा अपघात पांजरा येथील बीएसएनएलच्या कार्यालयाजवळ झाला. अपघात एवढा भयानक होता की, कार महामार्गावरील सहा बॅरिकेड्स तोडून सर्व्हिस मार्गावर आदळली.   


या अपघातात विक्रम गादे व आदित्य पुण्यपवार या दोघांचाही घटनास्थळी मृत्यू झाला.   कारमध्ये मासाचे व हाडांचे तुकडे पडले होते. या घटनेतील जखमींपैकी सुजल चव्हाण व सुजय मानवटकर यांना बोकारा येथील रुग्णालयात तर जय भोंगळे याला नागपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.


अपघातातील पाचही युवक २० ते २१ वयोगटातील आहेत. यातील विक्रम गादे हा विधि पदवीचा तर आदित्य पुण्यपवार हा महादूला येथील सोनेकर कॉलेज ऑफ फार्मसीचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. महादुला येथे तो भाड्याने मित्रा सोबत राहत होता. जय संजय भोंगाडे व सुजल प्रमोद चव्हाण हे दोघे बीटेक द्वितीय वर्षाचे विद्यार्थी आहेत.  सुजय मानवटकर हा औषध शास्त्रामध्ये द्वितीय वर्षाला आहे. विक्रम गादे हा एका वकिलाकडे मदतनीस म्हणून काम करीत होता.


अपघातापूर्वी बनविलेली रिल्स इंस्टाग्रामवर : - 

अपघातापूर्वी बनवलेली रिल्स समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे.गाडी कोण चालवित होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.महादुला परिसरातून जात असताना रात्री २ वाजून ३८ मिनिटांनी मागच्या सीटवर बसलेला मित्र मोबाईलने रिल्स बनवित असल्याचे दिसत आहे.कारसुद्धा स्टंटबाजी करत चालवित असल्याचे या चित्रफितीवरून दिसते.घटनेचा पुढील तपास कोराडी पोलीस करीत आहेत .

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !