पोर्ला वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या नवरगाव (दक्षिण) नियत क्षेत्रामध्ये निलगाय ची शिकार प्रकरणी 10 आरोपी जेरबंद ; दोन आरोपी फरार

पोर्ला वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या नवरगाव (दक्षिण) नियत क्षेत्रामध्ये निलगाय ची शिकार प्रकरणी 10 आरोपी जेरबंद ; दोन आरोपी फरार 


मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक


गडचिरोली : जंगलात निलगाय ची शिकार करून तिच्या मांसाची गावात विक्री करीत असताना वनविभागाने धाड टाकून १० आरोपींना जेरबंद केले.दोन आरोपी फरार आहेत. सदर घटना शनिवारी नवरगाव येथे घडली. आरोपींकडून नीलगायीचे शिर,पाय, मांस व इतर अवयव तसेच कापण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले आहेत. सदर घटनेने वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.


आरोपी : - 

खुदकम रघुनाथ गेडाम वय,25 वर्ष रा.कुऱ्हाडी,अक्षय प्रभाकर सेलोटे,वय,22 वर्ष रा.नवरगाव,रोशन दामोधर भोयर,वय,22 वर्ष,रा.नवरगाव,निखिल गिरिधर ठाकरे वय,30 वर्ष रा.चुरचुरा,सौरभ सुरेश आवारी वय,20 वर्ष, रा.नवरगाव,विक्रांत प्रकाश बोरकुटे वय,23 वर्ष,रा.गोगाव,संकल्प संजय उंदीरवाडे वय,24 वर्ष रा.नवरगाव,संदीप कानिफ चुधरी रा.नवरगाव, आकाश प्रभाकर सेलोटे रा.नवरगाव,जगदीश देवराव थोराक रा.नवरगाव यांना अटक करण्यात आली आहे. 


समीर रवींद्र मडावी (रा.कुऱ्हाडी) व ओमराज विजय राजगडे (रा.चुरचुरा) हे दोन आरोपी फरार आहेत.


पोर्ला वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या नवरगाव (दक्षिण) नियत क्षेत्रामध्ये दि.13 जुलै रोजी निलगायीची शिकार करण्यात आली. शिकारीनंतर निलगायीच्या मांसाची गावात विक्री करण्यात येत असल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाली. वनविभागाने गोपनीय माहितीच्या आधारे धाड टाकून दहा आरोपींना अटक केली. 


त्यांना रविवारी गडचिरोली जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दहाही आरोपींना पाच दिवसांची वनकोठडी सुनावली आहे.सदर कारवाई पोर्लाचे वनपरिक्षेत्र अधिकारी राकेश मडावी चुरचुरा चे क्षेत्र सहायक के.बी.उसेंडी, पोर्लाचे क्षेत्र सहायक अरुण गेडाम,मरेगावचे क्षेत्र सहायक समर्थ,पोर्ला चे वनरक्षक विकास शिवणकर,दिभना चे वनरक्षक,गणेश काबेवार,किटाळीचे,वनरक्षक संदीप लामकासे,वनरक्षक नितीन भोयर,वाहनचालक देवीदास चापले,वनमजूर विजय म्हशाखेत्री,गिरिधर बांबोळे, छत्रपती डहाले, दुर्योधन मेश्राम,सोनू खोब्रागडे,रवि डहाले, रूपेश मुनघाटे यांच्या पथकाने केली.



#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !