तात्पुरती मलमपट्टी लावणारा अर्थसंकल्प. - खासदार डॉ.नामदेव किरसान

तात्पुरती मलमपट्टी लावणारा अर्थसंकल्प. - खासदार डॉ.नामदेव किरसान 


एस.के.24 तास


गडचिरोली : महाराष्ट्रातील उद्योग, युवकांच्या हातातील रोजगार गुजरात ला पळवून नेणाऱ्या खोके सरकारला, महाराष्ट्रातील जनतेने लोकसभा निवडणुकीत  चांगला धडा शिकविला असल्याने, जनतेच्या कष्ठाच्या पैशातून बडजबरीने विविध कर आकारून आता आगामी विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याकरीता तात्पुरत्या घोषनेचा पाऊस पाडणारा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.


असून राज्यसरकारचे अंतरीम अर्थसंकल्प म्हणजे तातपुरती मलमपट्टी लावणारे आहे. बेरोजगारी, महागाई सारख्या असंख्य समस्या वाढत असताना देखील रोजगार वाढीसाठी कुठलीही मोठी घोषणा करण्यात आलेली नाही. शेतीला हमीभाव देण्यासंदर्भात कुठलीही तरतूद नाही. 


राईस मिलिंग चा मोठा भ्रष्टाचार अघडकीस आले असताना त्यावर कुठलीही कार्यवाही करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आलेली नाही. गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य व्यवस्था मोडकळीस आली आहे, पुरेशा रुग्णवाहिका नसल्याने रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री हेच राज्याचे उपमुख्यमंत्री असल्याने गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाकरीता भरीव निधी मिळेल असे वाटले होते मात्र या अर्थसंकल्पाने जिल्ह्यातील लोकांना नैराश्यच दिले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !