आर्थिक विवंचनेतून टोकाचे पाऊल उचलत एका विवाहित इसमाने गोंदिया - चंद्रपूर या धावत्या रेल्वेसमोर उडी घेवून आत्महत्या

आर्थिक विवंचनेतून टोकाचे पाऊल उचलत एका विवाहित इसमाने गोंदिया - चंद्रपूर या धावत्या रेल्वेसमोर उडी घेवून आत्महत्या


राजेंद्र वाढई - उपसंपादक


मुल : आर्थिक विवंचनेतून टोकाचे पाऊल उचलत एका विवाहित इसमाने गोंदिया - चंद्रपूर या धावत्या रेल्वेसमोर उडी घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी दि.3/06/2024 ला  वा.दुपारी 12:00 वा.दरम्यान मुल तालुक्यातील बेलघाटा गावाजवळील रेल्वे गेटच्या जवळ घडली.

बंडू राजन्ना नलूरवार वय,50 वर्षे वॉर्ड न.02 मूल असे मृत इसमाचे इसमाचे नाव आहे.

मुल शहरातील कुणबी मोहल्ला वार्ड नंबर 02 येथे राहणाऱ्या बंडू नलुरवार यांचे कपडे प्रेस करायचे छोटेशे दुकान होते.मात्र मिळणाऱ्या उतपन्नातून कुटुंबाचा गाडा हाकणे शक्य नसल्याने मागील दोन महिन्यांपासून आर्थिक विवंचनेत होता.अशी माहिती पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून पुढे आली.

आर्थिक अडचणीमुळे नैराश्यात असलेले बंडू नलुरवार हे सकाळी घरून निघून मूल शहरापासून जवळपास 5 कि.मी. अंतरावर असलेल्या सिंदेवाही मार्गावरील बेलघाटा गावाजवळील रेल्वे गेट च्या जवळपास उभे होते.दरम्यान गोंदियाकडून चंद्रपूर कडे येणारी रेल्वे येताच रेल्वे समोर उडी घेतली.


यात बंडूच्या शरीराचे छिन्नविछिन्न तुकडे तुकडे झाले.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पुलिस दाखल होवून मृतदेह शविच्छेदनासाठी मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.बंडूच्या दुर्दैवी मृत्यूने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.पुढील तपास मुल पोलीस करीत आहेत.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !