लोकहित च्या चंद्रपूर शहर महिला अध्यक्षपदी,अंजली इटनकर व मुल तालुका अध्यक्ष पदी,मारोती शेरकी यांची नियुक्ती.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मुल : राष्ट्रीय लोकहित सेवाच्या चंद्रपूर महिला शहराध्यक्षपदी चंद्रपूर च्या अंजली देवेंद्र इटनकर यांची नियुक्ती करण्यात आली.मुल तालुका अध्यक्ष पदी,मारोती शेरकी यांची नियुक्ती करण्यात आली.
सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या इटनकर ह्या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या एक सदस्य असून त्यांचे सामाजिक कार्यातील योगदान आज पर्यंत मोलाचे ठरले आहे.
शहरातील विविध कार्यक्रमांत त्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे.नुकत्याच चंद्रपूरात थाटात पार पडलेल्या लोकहिताच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभात त्या प्रामुख्याने उपस्थित होत्या.
सध्या लोकहितचे कार्य प्रगतीपथावर असून त्याची धूरा मुल चे दत्तात्रय समर्थ हे सांभाळत आहेत.सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी लोकहितने नेहमीच पुढाकार घेतला आहे.हे विशेष नवनियुक्त अंजली इटनकर व मारोती शेरकी यांना लोकहित च्या एका छोट्याखानी कार्यक्रमात नियुक्तीपत्र सुपूर्द करण्यात येणार असल्याचे समर्थ यांनी सांगितले.