सोनापुरात विजेचा लपंडाव मात्र बिल वसुली मध्ये जाेरात ; गाव मात्र अंधारात.

सोनापुरात विजेचा लपंडाव मात्र बिल वसुली मध्ये  जाेरात ; गाव मात्र अंधारात.


सुदर्शन गोवर्धन - प्रतिनिधी 


सावली : शहरात तापमानाचा पारा चाळिशीच्या पार जात आहे.रात्री देखील ३० ते ३५ अंशावर तापमान राहत असल्याने नागरिक अधिकच त्रस्त आहेत. त्यामुळे दिवसा तसेच रात्री अंगाची होणारी लाहीलाही टाळण्यासाठी सर्वच जण पंखे,कूलरचा गारवा घेत आहेत. 


अशातच सोनापूर तसेच आजू बाजूच्या ग्रामीण भागात ठिकठिकाणी विजेच्या लपंडावाचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे ना घरात थांबू शकतो,ना घराबाहेर जाऊ शकतो, अशी अवस्था होत आहे. असाच अनुभव मागील काही दिवसांपासून सोनापूर व आजूबाजूच्या  परिसरातील नागरिक घेत आहेत. विजेअभावी लहान मुले, वृद्ध, रुग्ण कमालीचे त्रस्त महावितरणकडून विद्युत ग्राहकांना चोविस तास वीज उपलब्ध व्हावी,अशी नागरिकांना अपेक्षा असते. 


परंतु सोनापूर गावात वेळीअवेळी वीज पुरवठा खंडीत हाेत असल्याने वीज ग्राहकांचा मागील आठ दिवसांपासून अपेक्षाभंग होत आहे. मात्र याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे, तर दुसरीकडे वीज बिलाची मात्र सुलतानी वसुली सुरू असल्याचे बोलल्या जात आहे.  असा खेळखंडोबा सुरू राहिला.


 तर नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. एखाद्या वेळी वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर गावात अनुचित घटना घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे महावितरणने ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडित होणार नाही, याकडे लक्ष द्यावे,अशी मागणी सोनापूरवासिया कडून हाेत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !