उपजिल्हा रूग्णालय वरोरा येथे नेत्रदान दिवस व रक्तदान दिवस उत्साहात साजरा.

उपजिल्हा रूग्णालय वरोरा येथे नेत्रदान दिवस व रक्तदान दिवस उत्साहात साजरा.


मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक


वरोरा : दिनांक १४ जून २०२४ ला उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे जागतिक नेत्रदान दिवस व रक्तदान दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमासाठी व्यासपीठवर डॉ.प्रफ्फूल खूजे वैद्यकीय अधीक्षक, डॉ.वंदेश शेंडे नेत्रशल्य चिकित्सक, डॉ.  स्नेहाली शिंदे नेत्र शल्य चिकित्सक,श्री राजेंद्र मर्दाने पत्रकार,सौ वंदना विनोद बरडे अधीसेवीका,डाॅ प्रतिक दांरुडे, वैद्यकीय अधिकारी, श्री मेश्राम नेत्र अधिकारी, उपस्थित होते.

मान्यवरांनी दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक डॉ वंदेश शेंडे यांनी केले त्यात नेत्रदाना वीषयी मार्गदर्शन केले..डाॅ स्नेहाली शिंदे यांनी नेत्रदान करतांनी काय काळजी घ्यायची याविषयी मार्गदर्शन केले.सौ वंदना विनोद बरडे यांनी नेत्रदान, रक्तदान करण्याचें आवाहन केले व त्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आवाहन केले.तसेच त्यांनी स्वतः चा नेत्रदान देहदान रक्तदान अवयव दान याचा फार्म भरला व सर्वांनी भरावा याचे आवाहन केले. तसेच आजकाल मोबाईल व काॅम्पुटर वर काम करावे लागते.


मुल आजकाल मोबाईल घ्या आहारी गेले आहे.जो तो मोबाईल परसन झाला आहे.खूप आॅडिक्शन झाले आहे.म्हणून तंत्रसांधनांचा वापर बचवून करावा.खूप बीकट परीस्थीती आली आहे.डोळ्यांच्या आजाराचे प्रमाण वाढले आहे.नेत्रदानासाठी नेत्राची मागणी वाढत आहे. पण दान दाते म्हणजे नेत्रदान करणार्यांची संख्या कमी होत आहे. ‌ती वाढावी म्हणून नेत्रदान अवश्य करावे.डाॅ. प्रफ्फुल खूजे यांनी नेत्रदान विषयी मार्गदर्शन केले.


 तसेच चंद्रपूर जिल्ह्याचा नेत्र चिकित्सा आपरेशन करण्यामध्ये पहीला क्रमांक आला.त्याबद्दल सर्व अधिकारी व कर्मचारी यांचें कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.सूत्र संचालन सोनाली राईसपाईले व आभार प्रदर्शन श्री दिपक अंबादे नेत्र अधिकारी यांनी केले.कार्यक्रमासाठी वंदना विनोद बरडे अधीसेवीका व लक्ष्मीकांत ताले, विवेक मेश्राम,दिपक अंबादे,कूंदा मडावी यांनी मेहनत घेतली व कार्यक्रम सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पाडला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !