गडचिरोली आगाराच्या - मौशीखांब जाणाऱ्या बस मधे चोरी
★ वेळेवर बस न सोडल्यामुळे घटना घडली.गाव खेड्यात बस प्रवासी मध्ये भीती चे वातावरण
मुनिश्वर बोरकर - गडचिरोली
गडचिरोली : गडचिरोली आगाराची बस गडचिरोली मौशीखांब २ वाजता जाणारी एस.टी.तबल साडेतिन वाजता उशिरा सुटली त्यामुळे सदर बसमधे जाणाऱ्यांची तोबा गर्दी झाली.बसमधील गर्दीचा फायदा घेऊन भुरट्या चोरट्यांनी दोन व्यक्तींच्या पैसाची चोरी केली.
हि घटना आबेशिवणी येण्यापूर्वीच घडली परतु ज्यांची चोरी झाली त्यांना मौशिखाब उतरल्यावर माहीती झाली.गर्दीमधे चोर सापडला नाही.दि.६ जुन ला गडचिरोली आगारांची बस उशिरा मौशीखाब कडे निघाली त्यामुळे बसमधे प्रचंड गर्दी झाली व या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी लालाजी मेश्राम मौशीखांब यांच्या खिश्यातुन साडेनव हजार रुपयावर डल्ला मारला.
लालाजी मेश्राम हा बोद भरतीवरून गावाकडे मौशीखाब जात होता.त्याची पुर्ण कमाई चोरीस गेली.जिजाबाई मसराम गोगाव हि लग्नाला जात होती.तिचे 3 हजार रुपयाची चोरी झाली.
सदर बाब बस वाहक यांना सांगीतले परतु चोराला रंगेहाथ कुणीही पकडू शकले नाही त्यामुळे चोरट्याचे फावले.अश्या घटना अनेकदा घडल्या असल्याचे प्रवासांनी सांगीतले. खेडेगावातही जाणाऱ्या बस मधे चोरी होतो आणि चोर पसार होतो.