गडचिरोली येथे बोगस जात प्रकरणी पोलीस विभागातील शिपाई निलंबित. ★ धनगर झाडे जातीतील घुसखोरी प्रकरण ; बोगस जात प्रमाणपत्र सादर करणारे उमेदवार पुन्हा अडकण्याची शक्यता.

गडचिरोली येथे बोगस जात प्रकरणी पोलीस विभागातील शिपाई निलंबित.


धनगर झाडे जातीतील घुसखोरी प्रकरण ; बोगस जात प्रमाणपत्र सादर करणारे उमेदवार पुन्हा अडकण्याची शक्यता.


सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक


गडचिरोली - सन २०२२ मध्ये पोलीस विभागात शिपाई पदावर निवड झालेल्या श्रीकृष्ण डुबलवार याचे गडचिरोली जात पडताळणी समितीने जात वैद्यता प्रमाणपत्र अवैद्य ठरविल्याने पोलीस अधीक्षक गडचिरोली यांनी निलंबित केले आहे.


गडचिरोली जिल्ह्यात झाडे कुणबी या जातीचे लोक धनगर झाडे या नामसदृश्याचा गैरफायदा घेत भटक्या जमाती क मध्ये घुसखोरी करून नोकरी बळकावीत आहेत. 


याबाबत धनगर /कुरमार संघटनांनी आक्षेप घेत आंदोलने केली.याबाबत प्रशासनाने दखल घेत अनेक प्रकरणे जात पडताळणीत अवैद्य ठरवलेली आहेत.त्यातील श्रीकृष्ण डुबलवार यास मुंबई पोलीस (शिक्षा व अपील) १९५६ मधील नि.क्र.३ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम - १९५१ मधील नि. क्र.२५ नुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन  निलंबित केले आहे.

        

यामुळे धनगर झाडे जातीत घुसखोरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनामध्ये खळबळ माजली आहे.


सन 2022 व 2021 चे पोलिस भरतीत श्रीकृष्ण डुबलवार सह इतरही उमेदवारांची जात वैधता प्रमाणपत्र अवैध झाले आहेत. तसेच SRPF काटोल भरतीत अश्याच प्रकारे काहींचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध झाले आहेत त्यामुळे शासनाची फसवणूक करून पोलीस भरतीत भाग घेतले असल्याने त्यांना सदर भरतीतून बाद करून गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. 


परंतु निलंबित करून एकावरच कारवाही का आणि चुकीच्या पद्धतीने जात प्रमाणपत्र मिळवून नौकरी मिळविण्याचा प्रयत्न केल्याने पोलीस विभाग कारवाही करणार का आणि धनगर समाजाच्या मुलांना सदरचे जागा देवून शासन अन्याय दूर करणार का असा सवाल धनगर / कुरमार समाजाने प्रश्न समोर उपस्थित केला आहे. 


चंद्रपूर जात पडताळणी समितीने शैक्षणिक प्रयोजनार्थ व सेवा प्रयोजनार्थ गडचिरोली जिल्हा जात पडताळणी समितीने ज्या पद्धतीने झाडे NT,C चे जात वैधता प्रमाणपत्र दिले आहेत त्यांची फेरतपासणी केल्यास यात मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाल्याचे दिसून येईल त्यामुळे जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी लक्ष घालून दोषीवर कार्यवाई करावी. 


झाडे धनगर गडचिरोली जिल्ह्यात राहतात का, झाडे कुणबी किंवा झाडे नामसदृष्य जमात आहे का हे सखोल चौकशी न करता झाडे NT,C जात प्रमाणपत्र दिले जात आहे त्यामुळे मूळ धनगर समाजाच्या मुले आरक्षण पासुन वंचित राहतो आणि चुकीच्या पद्धतीने झाडे जातीचे जात प्रमाणपत्र मिळवून दुसऱ्या समाजाचे मुले नौकरी प्राप्त करीत आहेत.


या सर्व प्रकारावर शासनाने आळा न घातल्यास भविष्यात धनगर / कुरमार समाज रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा धनगर / कुरमार समाज पण दिला आहे,त्यामुळे शासन काय कारवाई करते याकडे धनगर/कुुुरमार समाज वाट पाहत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !