गडचिरोली एस.टी.महामंडळाचा वर्धापन दिन साजरा.
मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक
गडचिरोली : एसटी महामंडळाचा ७६ वा वर्धापन दिन गडचिरोली जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकावर साजरा करण्यात आला.प्रामुख्याने एस.टी महामंडळ गडचिरोली येथे रांगोळ्या काढून,परिसर स्वच्छ करणे,तोरणे बांधुन सजविण्यात आले होते.
येणाऱ्या जाणाऱ्या प्रवासांना एस.टी.महामडळातील कर्मचाऱ्यानी पेळे वाटण्यात आले.प्रवासी व एस.टी.च्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्यात.दरवर्षी १ जुन ला एसटीचा वर्धापन दिन साजरा करण्यात येतो.
७६ हजार कर्मचारी प्रवासांना खेड्या पाळ्यात, पाड्यात रात्र दिवस उन्हाची,पावसाची पर्वा न करता सेवा देतात हि एक अभिमानाची गोष्ट आहे.
जेष्ठ नागरिक,दिव्यांग,पत्रकार,आदि जवळपास २० संघटनांना सवलतीच्या दरात प्रवास करण्यास एस.टी. महामंडळ सहकार्य करीत असतो. एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापक डॉ.माधव कुसेकर यांनी सर्व प्रवासाना व कर्मचाऱ्याना शुभेच्छा दिल्यात.