घोटसुर - कारका रोड चा पुल कोसळला. सार्व. बांधकाम विभागाचे दुर्लक्ष.
मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक
एटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेला घोटसुर ते कारका ४ कि.मी अंतरावरील असलेला रस्त्यावरील फुल गेल्या दिड वर्षापासून कोसळला असुन कोसळलेल्या पुलाच्या बाजुला भले मोठे झाड पडले आहे.
नक्षलग्रस्त घोटसुर ते कारका व नंतर छत्तीसगड या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत एका ठेकेदाराने पुला चा बांधला कामाच्या कालावधी चा बाजूला बोर्ड सुध्दा लावलेला नाही.
दिड वर्षापासून कोसलेल्या पुलाकडे प्रशासनाचे लक्षच नाही.सदर पुलाची पाहणी केली असता पुलाचे पिल्लर खोलवर न बांधता अगदी रेति वरच बांधले होते.पुलही उंचीने कमी होता. एकंदरीत पुलंच तुटल्यामुळे रहदारी तुटली असुन चार चाकी वाहने सुद्धा आवागमण करीत नाही.
पावसाळ्यात तर मार्गच बंद असतो तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन पुलाचे बांधकाम करावे अशी मागणी घोटसुर ग्रामस्त करीत आहेत.