निसर्गाची राजकीय खेळी पावसाने मारली दळी धानाने केली घोळी.

निसर्गाची राजकीय खेळी पावसाने मारली दळी धानाने केली घोळी.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक ब्रह्मपुरी


ब्रम्हपुरी : दिनांक,३० जून २४ बळी राजा जनतेला अन्नाने तारणारा आणि निसर्ग त्याला तजवुन मारणारा.कडकत्या मे महिन्याच्याअग्निपताका नक्षत्राच्या उन्हातान्हात शेतीची मशागत करून धुरे- पारे तासतुस ,काट्या - गोटट्या पेटवपाटव करून जुन महिन्याच्या सुरुवातीला धान आवत्या,परा टाकुन निसर्गावर अवलंबून असलेल्या पाण्यासाठी आकाशात जमलेल्या ढगांकडे वाट पाहत असतो. 


धान पेरणी नंतर लहरी पावसाच्या सरी ठराविक कालावधीपर्यंत न पडल्यामुळे आणि तापत असलेल्या उन्हामुळे शेतकरी हा आभाळाकडे डोळे लावून मनातल्या मनात येरे येरे पावसा तुला देतो पैसा या कवितेच्या ओळी कडक उन्हात गातो.


गाता गाता संपूर्ण शरीर घामाघूम होतो तरीपण पाऊस येण्याची काही चिन्ह त्याला दिसत नाही त्यामुळे तो चिंताग्रस्त होतो आणि दुबार पेरणीचे संकट ओढवते की काय या  चिंतेने त्याला रात्रभर झोप येत नाही.मृग, आद्रा नक्षत्र संपत आले  तरी पाहिजे त्या प्रमाणात पाऊस न पडल्यामुळे जमिनीत पेरलेले धान  अजूनही वापलेले नाही. 


पाऊस पडतो परंतु  राजकीय खेळी खेळतो की काय असा संभ्रम शेतकऱ्यांच्या,सर्व साधारण जनतेच्या मनात  तयार झालेला आहे.सध्या पडत असलेला पाऊस हा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्रात कुर्झा, ब्रह्मपुरी ते पुढे दक्षिण दिशेला सतत पडत आहे आणि तोरगाव,नान्होरी, नांदगाव, भालेश्वर,अ-हेरनवरगाव, पिंपळगाव (भोसले) या चिमुर विधानसभा क्षेत्रात उत्तर दिशेला पडत नाही आहे.


ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघ हा कांग्रेस पक्षाचे विधानसभा विरोधीपक्षनेते मान.विजयभाऊ वडेट्टीवार तर चिमुर विधानसभा क्षेत्र आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचा आहे.


चिमूर विधानसभा क्षेत्रात खुपच कमी पाऊस पडला आहे त्यामुळे या परिसरातील शेतात पेरलेल्या धानाने मातीत घोडी करून  ठेवलेली आहे आणि वाट पाहत आहे तो येणाऱ्या दमदार पावसाची.पाऊस येऊन धान वापल्यानंतर शेतकरी आनंदाने निंदन,खुरपण  रोववण्याच्या कामाला हसत हसत सुरुवात करण्याच्या तयारीत आहे.


अन्यथा पाऊस जर आला नाही  कही धूप कही छाव असा खेळ सुरू राहिला तर दुबार पेरणी साठी धान आणि पैसा आणायचा कुठून हा बळीराजाच्या चिंतेत भर टाकणारा विषारी प्रश्न डोळ्यापुढे संकट म्हणून ऊभा आहे.या संकटावर  एकच रामबाण उपाय म्हणजे पाऊस.नाही तर दोरीधरुन फाशी अथवा जहर पीऊन  आत्महत्या करणे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !