ब्रेकिंग न्युज....
सिंदेवाही ते मुल महामार्गावर फौजी ढाब्याजवळ सामोरा समोर दुचाकी च्या अपघातात,पती - पत्नी किरकोळ जखमी एक जण गंभीर
मंगेश सोनटक्के - प्रतिनिधी
मुल : सविस्तर वृत्त असे की आज दिनांक,02/06/2024 रोज रविवारी रात्रौ,10 : 00 वा.प्रशांत धोंडूजी ठिकरे वय,56 वर्ष रा.राजोली व पत्नी वंदना प्रशांत ठिकरे वय,48 वर्ष राजोली ता.मुल जिल्हा,चंद्रपूर
हे लग्न समारंभ कार्यक्रम आटोपून राजोली कडे येत असताना फौजी ढाब्या मधून पवन सूर्यभान वसाके वय,34 वर्ष वॉर्ड क्र.03 दुर्गापूर जि.चंद्रपूर हा युवक महामार्गावर निघताच जोरदार धडक दिली.
त्यात सामोरा समोर दुचाकी च्या अपघात होऊन पती - पत्नी किरकोळ जखमी युवक गंभीर जखमी झाला.
अपघाताची माहिती राजोली येथील ग्रा.पं.सदस्य,तिरुपतीजी निखुरे,श्यामभाऊ पुट्टावार,अमित येनूरकर,दीपक गोडे,सचिन गेडाम यांनी आरोग्यवर्धिनी प्रा.आ.केंद्र,राजोली ता,मुल जिल्हा,चंद्रपूर येथे भरती केले.