ओबीसी चे हकका साठी भुजंग ढोले यांचा नवा आदर्श. - ऍड.राजेंद्र महाडोळे
राजेंद्र वाढई - उपसंपादक
पोंभुर्णा : ओबीसी चे हक्क व अधिकार मिळवून घेण्यासाठी ओबीसी चळवळ मोठ्या प्रमाणात निर्माण झाली असे दिसत असताना सुद्धा गावांमध्ये ओबीसी चळवळ हक्का व अधिकारासाठी जागृती आणणे गरजेचे आहे.
आणि म्हणून राष्ट्रीय ओबीसी एससी एसटी क्रांती दलाचे तालुकाध्यक्ष भुजंग भाऊ ढोले यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ओबीसी बांधवांना एकत्र करून ओबीसी हक्क व अधिकार शिबिर आयोजित केले ओबीसीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी जरा पायंडा पाडला तर गल्लीबोळ्या गावागावात तालुका तालुक्यात ओबीसी चे छोटे-मोठे शिबिर सुरू होतील.
व त्यामुळे आपण आपल्या हक्काप्रती आणखी मजबूत होऊन ओबीसीचा लढा आणखी तीव्र करता येईल या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी एससी एसटी क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष ऍड .राजेंद्र महाडोळे डॉक्टर संजय घाटे रामभाऊ महाडोळे गुरुभाऊ चौधरी दीपक वाढई, डॉ.पद्माकर लेनगुरे,सद्गुरू ढोले, अमोल दादा गुरनूले, राजेंद्र मांदाडे, अशोक सातपुते,अरुण गुरनुले,कालिदास मोहुर्ले, गुलाब गुरनुले, छत्रपती गुरनुले, लक्ष्मण पातळे, जगन कोहळे,महेश वाघमोरे, या वाढदिवस त्याच्या अवचित त्या शिबिराला प्रामुख्याने उपस्थित होते.