गोंदिया जिल्ह्यातील तेंदूपत्त्याच्या कामावर आलेले कामगार सस्याची शिकार केल्या प्रकरणी ; सात आरोपी अटकेत
एस.के.24 तास
बल्लारपूर : सस्याचे मास खाण्याकरिता फासे लावून जंगली सस्यांची शिकार करणाऱ्या 7 जणांना वन्यजीव संरक्षण अधिनियम कायद्या अंतर्गत अटक करण्यात आली,शिकारीचे फासे जप्त करण्यात आले असून एका जखमी अवस्थेत असलेल्या ससा ला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पत उपचाराकरिता पाठविण्यात आले परंतु ससा मृत पावला.
बल्लारपूर वनपरीक्षेत्र अंतर्गत कळमना नियतक्षेत्रतील मौजा पळसगाव येथे तेंदूपत्त्याचे कामावर असलेले कामगार शिकारीचे फासे लावून सस्याची शिकार करीत असल्याची गोपनीय माहिती वनपरीक्षेत्र अधिकारी बल्लारपूर यांना झाली, वनपरीक्षेत्र अधिकारी यांनी पळसगाव येथील तेंदू गोडाऊन मागील परिसरात सापळा रचून फासे लावून शिकार करणाऱ्या
दिलीप रामा मेश्राम रा.गोंगली,तालुका सडक अर्जुनी, जि गोंदिया,राजू काशिनाथ मेश्राम रा.साकोली जि. भंडारा, भोजराम शंकर कोल्हे रा. सौंदळ जिल्हा गोंदिया, विनोद रामकृष्ण वेंडवार जिल्हा गोंदिया, सुभाष वासुदेव चन्ने रा.सौंदड जिल्हा गोंदिया, पुरुषोत्तम मोतीराम वलथरे रा.किनी जिल्हा भंडारा, भागू पांडुरंग शेंडे, किन्ही,साकोली, जिल्हा भंडारा यांना एक ससा व फासे यासह ताब्यात घेण्यात आले.
आरोपिंची सखोल चौकशी केली असता खाण्याकरिता सस्याची शिकार केल्याचे कबूली दिली त्यावरून 7 आरोपी विरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 कलम अन्वये वनगुन्हा जारी करण्यात आला.आरोपिंची वैद्यकीय तपासणी करून बल्लारपूर न्यायालयात हजर करण्यात आले.
सदर कारवाई क्षेत्र सहायक व्ही.टि.पुरी, वनरक्षक परमेश्वर अनकाडे,सुनील नन्नावरे, मनोहर धाईत,भारती तिवाडे,व्ही वनमजूर यांनी सहकार्याने केली.
सदर प्रकरणाचा पुढील तपास मध्य चांदा वनविभाग चंद्रपूर चे उपवनसंरक्षक स्वेता बोड्डू व सहायक वनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे यांचे मार्गदर्शनात बल्लारपूर चे वनपरीक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे करीत आहेत.