गडचिरोली येथील नवविवाहित मुलीचा मेहंदी मिटण्यापूर्वीच पतीचा मृत्यू,लग्नाच्या चौथ्या दिवशी बुडून नवरदेवाचा मृत्यू. ★ भामरागड च्या बिनागुंडाची घटना, साळ्याला वाचविताना भाऊजी गमावला जीव.

गडचिरोली येथील नवविवाहित मुलीचा मेहंदी मिटण्यापूर्वीच पतीचा मृत्यू,लग्नाच्या चौथ्या दिवशी बुडून नवरदेवाचा मृत्यू.


भामरागड च्या बिनागुंडाची घटना, साळ्याला वाचविताना भाऊजी गमावला जीव.


एस.के.24 तास


भामरागड : भामरागड लग्नानंतर भामरागड तालुक्यातील बिनागुंडा धबधब्यावर पत्नी व इतर नातेवाईकांसोबत फिरायला आलेल्या नवरदेवाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.त्याला वाचविताना भाउजी मृत्यू झाल्याची घटना 11 जून रोजी दुपारी 3 : 00 वाजता च्या सुमारास घडली.


नवनीत राजेंद्र धात्रक वय,27 वर्ष रा.चंद्रपूर असे साळ्याचे तर बादल श्यामराव हेमके वय,39 रा.आरमोरी असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.


नवनीत यांचे 7 जून रोजी लग्न झाले.लग्नानंतर ते बादल हेमके यांच्या घरी आले.बादल हे भामरागड तालुक्यातील पल्ली ग्राम पंचायतमध्ये ग्रामसेवक होते.ते भामरागड येथे राहत होते. हमके व धात्रक यांचे कुटुंब बिनागुंडा येथे फिरण्यासाठी गेले होते. 


नवनीत हा धबधब्यात आंघोळ करत असताना खोल पाण्यात गेला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात बादल हेसुद्धा पाण्यात उरतले.दोघांनाही पोहता येत नसल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.


याबाबतची माहिती लाहेरी पोलिस मदत केंद्राला देण्यात आली.दोघांचेही मृतदेह भामरागड येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आले.लाहेरी पोलिस मदत केंद्रात संपूर्ण कुटुंबाचे बयाण घेण्याचे काम उशिरा पर्यंत सुरू होते.


मेहंदी मिटण्यापूर्वीच पतीचा मृत्यू,लग्नाला अगदी चार दिवस झाले होते : - 


 नवनीत व त्यांची पत्नी दोघेही फिरण्यासाठी बिनागुंडा येथे आले होते. दोघांनीही सुखी संसाराचे स्वप्न बघितले होते. मात्र हे स्वप्न अधुरेच राहिले. अवघ्या चार दिवसांतच नवनीतने जगाचा निरोप घेतला. त्यामुळे नवविवाहितेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबाने एकच आक्रोश केल्याने वातावरण सुन्न झाले होते. या घटनेने परिसरात शोककळा पसरली.


पोहता येत नसल्याने झाला घात : - 


मृतक नवनीतला पोहता येत नव्हते. तरीही तो खोल पाण्यात गेला. त्याला वाचविण्याचा प्रयत्न बादल यांनी केला. बादल यांनाही पोहता येत नव्हते. दुर्दैवाने दोघांचाही मृत्यू झाला.


वर्षभरापूर्वी एका डॉक्टरने गमावला जीव : -


बिनागुंडा येथील धबधबा दिसायला अतिशय लहान आहे. मात्र या धबधब्यात उन्हाळ्यातही जवळपास 15 ते 20 फुट पाणी असते.धबधब्याची ही खोली लक्षात येत नाही. त्यामुळे धबधब्यात बुडून मृत्यू होतात. 


वर्षभरापूर्वी भामरागड तालुक्यात कार्यरत असलेल्या नागालैंड येथील डॉक्टरचा मृत्यू झाला होता. भविष्यातही अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने या ठिकाणी लोखंडी खांब उभारावेत. जेणेकरून नागरिक खोल पाण्यात जाणार नाही अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !