डॉ.नामदेव किरसान यांच्या विजयासाठी अनु.जातीचे मते ठरली निर्णयात्मक
★ डॉ.बाबासाहेब आंबेडकराचे संविधान फावले कांग्रेसला
मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक
गडचिरोली : तब्बल दहा वर्षांनंतर कांग्रेसचे चिमुर लोकसभा निवडणुकीचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान यांनी बाजी मारली असून भाजपाचे अशोक नेते पराभुत झालेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकराचे संविधान चिमुर लोकसभा निवडणुकीत केंद्रस्थानी ठेवल्यामुळे भाजपा संविधान संपविणार ह्या भितीपोटी
डॉ.नामदेव किरसान यांना चिमुर लोकसभा निर्वाचन क्षेत्रातील सर्व अनुसुचित जातीच्या मतदारांनी सर्वातोपरी सहकार्य केल्यामुळे व गेल्या दोन वर्षातील नाटक , दंडारी ' गृहप्रवेश , वाढदिवश व लग्न कार्यात डॉ. नामदेव किरसान यांची उपस्थिती व दौरा सुद्धा डॉ. किरसान यांना फायदेशिर ठरली.
तसेच विरोधी पक्ष नेते विजयभाऊ वडेड्डीवार यांचा प्रचारात झंझावती दौरा सभा सुद्धा विजयासाठी महत्वाचा ठरला. सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचितने सव्वा लाख मते घेतली होती त्यामुळे कांग्रेसच्या उमेदवारांचा पराभव झाला होता. २०२४ च्या निवडणुकीत वंचित १६ हजारावरच थांबली म्हणजेच चिमुर लोकसभा क्षेत्रातील ६ विधान सभेतील तमाम बौद्ध बांधवानी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाला व आंबेडकर घराण्याला न जुमानता कांग्रेसच्या उमेदवारांना सहकार्य केले. बसपाचे १९ हजार मते हे नेहमीचीच ठराविक मते आहेत . परंतू वंचित फॉक्टर न चालल्यामुळे डॉ. किरसान हे भरघोष मतानी विजयी झालेत त्यांना ६ , १७ . ७९२ मते मिळाली तर भाजपाचे अशोक नेते यांना ४ , ७६ , ० ९६ मते मिळाली डॉ. किरसान हे १ लाख ४१ हजार मताची आघाडी घेऊन विजयी झालेत.
भाजपाचे अशोक नेते गेल्या दहा वर्षात जनसंपर्क व विकासाची कामे न करताच ते आपल्याच तोऱ्यात राहीले यात बिजेपी व RSS चे प्रमुख अशोक नेतेवर नाराज होते. सोबतच वंचितची या निवडणुकीत पिछेहाट झाल्यामुळे अशोक नेते यांना पराभव पत्कारावा लागला . कांग्रेस ला RPI च्या नेत्यांनी प्रचार , सभेत भरपूर सहकार्य केले .कांग्रेसचे डॉ. आंबेडकराचे संविधान भाजपा बदलविणार केवळ आणि केवळ संविधान निवडणुकीच्या प्रचारात केंद्रस्थानी ठेवल्यामुळे गावोगावच्या बौद्ध बांधवांनी कांग्रेसला डोक्यावर घेतले.
तेही जिल्हातील RPI च्या नेत्यांना विचारपुस करूनच परंतु आजही कांग्रेस वाल्यांकडून RPI नेत्यांना डावलण्याचे धोरण सुरूच आहे . असे खाजगित RPI चे जिल्ह्यातील नेते बोलतांना दिसतात . RPI नेत्याचा वापर केवळ निवडणुकीत केल्या जातो कि काय ? हि पुर्वीपासूनची कांग्रेसची निति बदलवावी तात्पर्य एवढेच.