कोनसरी व सोमनपल्ली दोन ट्रक च्या भीषण अपघातात ट्रक चालक जागीच ठार.

कोनसरी व सोमनपल्ली दोन ट्रक च्या भीषण अपघातात ट्रक चालक जागीच ठार.


एस.के.24 तास


चामोर्शी : आष्टी येथून जवळच असलेल्या कोनसरी व सोमनपल्ली गावांच्या मधोमध दोन ट्रक च्या भिषण अपघातात एक ट्रक चालक जागीच ठार झाले  ही घटना सायंकाळच्या सुमारास घडली आहे.


गडचिरोली कडून ट्रक क्रं.CG 04 NJ 4834 हा आष्टी कडे येत असताना सुरजागड चे मेटल घेउन जाणारा ट्रक क्रं एम एच ४० सी एम ५६८५ ह्याने जोरदारपणे धडक दिल्याने समोरच्या गाडीतील चालक जागीच ठार झाला  समोरच्या ट्रक चा क्याबीन पुर्णपणे विस्कळीत झालेला आहे.



जखमी असलेल्या ईसमांचा अजूनही पत्ता लागलेला नाही मृतकाचे नाव विकास कुमार बिंद वय,२४ वर्ष रा.अलाहबाद असे आहे.



सदर घटनेची माहिती आष्टी पोलीस स्टेशन ला मीळताच पोलीस निरीक्षक विशाल काळे आपल्या चमूसह घटनास्थळी दाखल झाले व मृतकास आष्टी रुग्णालयात पाठविलें शवविच्छेदन करण्यात आल्या नंतर मृतदेह त्याच्या नातलगांना देण्यात येणार आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !