घोटसुर ते कारका रस्त्यावर लहान पुलाचे काम नित्कृष्ठ दर्जाचे.
गडचिरोली - मुनिश्वर बोरकर
एटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील कसनसुर सर्कल मधील घोटसुर ते कारका छत्तीसगड सिमेलगत बांदे रोडवर लहान पुलाचे (कलवड ) ची कामे सुरु असुन जुन्याच पुलाच्या (कलवट ) चारही आजुबाजुला भिंत उभारण्याच्या कामात नित्कृष्ठ दर्जाचे काम सुरु असुन सदर भाग अतिदुर्गम भागात येत असल्यामुळे सदर कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग एटापल्ली चे दुर्लक्ष असुन ठेकेदाराचे चांगलेच फावले आहे.
कसनसुर वरून घोटसुर मार्गावर तयार होत असलेले दोन- तिन कलवट च्या कामात गिट्टी , लोखंडी कटडे निकृष्ट दर्जाचे वापरल्या जात असून रेतीची रॉयल्टी नाही. सदर कामावरील ठेकेदार अहेरी चा असुन या ठेकेदाराचे कामे सुद्धा कामगाराच्या भरोसावर रामभरोसे कामे सुरु आहेत. तरी संबंधित सार्वजनीक बांधकाम विभागाच्या जि ई ने सदर कामाकडे लक्ष घ्यावे अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केलेली आहे.