व्याहाड खुर्द ते गांगलवाडी रस्त्याची दैनिय अवस्था ; सिमेंट कॉक्रेट रोड हवेतच विरला.
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक
सावली : व्याहाड खुर्द गेवरा हळदा ते गांगलवाडी या 40 कि.मी रस्त्याची आज दैनिय अवस्था झाली आहे.उद्या परवा पावसाळा सुरु होणार पुढे चिखल तुडवित वाहन कसे जायचे प्रश्न पडेल.
आत्ताच तर खड्यात रस्ता आहे रस्त्यात खड्डा प्रवासांना जिव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.सदर रस्ता हा वर्दळीचा रस्ता आहे.या रस्त्याने एस.टी महामंडळांच्या बसेच खाजगी " फोरव्हिलर टु व्हिलर " वाहनांची वर्दळ असते.जात असतात.40 कि.मी रस्ता पार करण्याकरीता एक ते दिड तास लागतात.
सदर परिसरातील नागरिकांची तक्रार आहे. ब्रम्हपूरी विधान क्षेत्राचे आमदार,विजयभाऊ वडेट्टिवार या परिसराचे नेतृत्व करतात.जेव्हा ते मंत्री झाले तेव्हा व्याहाड खुर्द येथील कांग्रेस च्या मेळाव्यात व्याहाड खुर्द ते गांगलवाडी रोड सिमेंट कॉक्रेटचा बनवून रस्त्याच्या दोन्ही बाजुला गटु लावून रस्ता बनवून देतो असे आश्वासन दिले होते.
आज ते विरोधी पक्ष नेते आहेत परंतु आजतागायत रस्त्याची डागडुगी सुद्धा झालेली नाही.दिलेले आश्वासन हवेतच विरले काय अशी विचारणा सदर परिसरातील नागरिक विचारीत आहेत.या रस्त्याने नेहमीच वाघ दिसतो. रस्ता ओलांडताना वाघाने झडप घेऊन वाहनावर धावला तर जिव गमविण्याची पाळी येणार आहे.
कर्तव्यदक्ष विरोधी पक्षनेते, विजय नेते वडेट्टिवार यांनी ब्रम्हपुरी क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणतात व या विभागांचा विकासही करताना दिसतात परंतु व्याहाड खुर्द ते गांगलवाडी रस्ता उपेक्षीतच आहे.