सावली येथे विरोधी पक्षनेते,विजय वडेट्टीवार यांचे कडून आर्थिक मदत.

सावली येथे विरोधी पक्षनेते,विजय वडेट्टीवार यांचे कडून आर्थिक मदत.


एस.के.24 तास


सावली : दिनांक,२० जुन २०२४ राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे कडून सावली शहरातील ३ नागरिकांना आर्थिक मदत देण्यात आले यात दुर्दर आजाराने दुःखद निधन, कॅन्सरग्रस्त रुग्ण व स्लॅब वरून पडून हात पाय निकामी झालेल्या व्यक्तिचा समावेश आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या तर्फे सावली शहर काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक मा.विजय मुत्यालवार,नगराध्यक्ष सौ.लताताई लाकडे,युवा शहर अध्यक्ष मा.अमरदीप कोनपत्तिवार यांच्या वतीने सदर मदत देण्यात आली.


सावली येथील तरुण स्व.नागेश दौलत निकुरे वय ३८ वर्षे रा.वॉर्ड क्र.११ हे काही दिवसापूर्वी तबेत बरी नसल्यामुळे दवाखान्यात भरती होते उपचारा दरम्यान दुर्दर आजाराने मृत पावले हे घरातील कमवते व्यक्ती होते त्यांच्या पश्यात बराच मोठा परिवार आहे. तसेच श्री.मारोती गुरुनुले वय ४२ वर्षे रा.वॉर्ड क्र.११ हे उपचार घेत असताना डॉक्टरांनी त्यांना कॅन्सर असल्याचे सांगितले.


आणी वॉर्ड क्र.६ येथील श्री.सुनील धोंडुजी भंडारे वय ४२ वर्षे हे मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते परंतु घरातील स्लॅब वर काम करीत असताना तोल जाऊन ते खाली पडले यात त्यांचा हात व पायला जबर मार बसला व दोन्ही हात पाय निकामी झाले हे  घरातील कमवते व्यक्ती,भूमिहीन व घरातील आर्थिक परिस्थिती कमजोर असल्याने उदर्निवाहासाठी जे मिडेल ते काम  करून कुटुंब चालवीत होते,पण नशिबाला वेगळेच मान्य होते.


निकुरे,गुरुनुले व भंडारे कुटुंबावर आर्थिक संकट आल्याने त्यांना आर्थिक मदतीची गरज असल्याची माहिती सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने यांना मिळताच राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधून लाटेलवार कुटुंबीयांना सदर मदत मिळवून दिली.


आर्थिक मदत देताना नगरसेविका सौ.साधनावाढई, सौ.ज्योती शिंदे,सौ.ज्योती गेडाम,नगरसेवक मा.सचिन संगीडवार,शेतकरी सह.कार्य.सोसायटी अध्यक्ष मा.मोहन गाडेवार,जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा.कमलेश गेडाम,युवा कार्यकर्ते मा.प्रकाश लोणबले,मा.राजू बुरीवार,मा.कुणाल मालवनकर,मा.सौरभ बोरकर  आदी उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !