सावली बसस्थानक समोर ट्रक च्या धडकेत शिक्षकाचा अपघाती मृत्यू.
एस.के.24 तास
सावली : चंद्रपूर-गडचिरोली मुख्य मार्गावरील बसस्थानक चौकात दुचाकी वरून जात असतांना नीलकंठ शेडमाके या शिक्षकास ट्रकने धडक दिल्याने मृत्यू झाला झाला आहे.
चंद्रपूरहून गडचिरोलीकडे जाणाऱ्या सिमेंट च्या ट्रकने शेडमाके यांना धडक दिली.आणि शेडमाके हे जागीच कोसळले व त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला.लगेच त्यांना सावली येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले.मात्र गंभीर दिखापट असल्याने उपचारादरम्यान डॉक्टराने मृत घोषित केले.
मृतक नीलखंठ शेडमाके हे सावली तालुक्यातील कढोली येथे आश्रम शाळेत शिक्षक असून मूळचे पेंढरी मक्ता येथील रहिवासी आहेत.त्यांच्या मृत्यू ने सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे. त्यांच्या मागे मोठा परिवार आहे.