मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक
वडसा : श्रीलंकेवरून तथागत भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थिधातुंचे आगमन गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली आणि दिक्षाभुमी वडसा येथे दि.२९ जुन ला होत आहे.
विविध बौद्ध राष्ट्रातील भिक्षुसंघ द्वारे विशेष मानवंदना देण्यात येणार असुन सदर कार्यक्रमांची रूपरेषा करण्याकरीता इंडो - एशिआ मेत्ता फाऊंडेशन विदर्भ शाखा नागपूर ची महत्वपूर्ण बैठक दिक्षा भुमी वडसा येथील बुद्ध विहारात धम्मबंधू नितिन गजभिये,स्मिता वाकडे नागपूर,गोपाल रायपुरे,ॲड.विनय बांबोळे,प्रा.मुनिश्वर बोरकर,समितीच्या सचिव,समताताई जांभुळकर अध्यक्षा कविता मेश्राम ' यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
इंडो - एशिआ मेत्ता फाऊंडेशन तर्फे श्रीलंका वरुन तथागत बुद्धांच्या अस्थिधातुंचे आगमन विदर्भात व गडचिरोली जिल्हयात होत आहे.
यात विशेष मानवंदना व भिक्खू संघाचे मार्गदर्शन लाभणार आहे.तरी बौद्ध बांधवांनी सहकार्य करून तथागत बुद्धाच्या अस्थिधातुंच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन नितिन गजभिये नागपूर यांनी केले.
सदर बैठकीला समिती च्या उपाध्यक्षा शामलाताई राऊत , सदस्या सरिता बारसागडे ' गायत्री वाहणे ' यशोदाबाई मेश्राम , बिनाताई पाटिल 'ममता नंदेश्वर , प्रेमिला बडोले तर शरद लोणारे,मारोती जांभुळकर,प्रकाश बारसागडे,संजय नंदेश्वर,पुरुषोत्तम बडोले,सुरेश बडोले आदिची उपस्थिती होती .