मॅजिक बस संस्थेच्या वतीने मकेपल्ली येथे जागतिक पर्यावरण दिन संपन्न.



मॅजिक बस संस्थेच्या वतीने मकेपल्ली  येथे जागतिक पर्यावरण दिन संपन्न.


एस.के.24 तास


चामोर्शी : मॅजिक बस इंडिया फाउंडेशन ( Netsle Healthy Kids) 'खेळाद्वारे विकास' कार्यक्रम चामोर्शी तालुक्यात मुलांच्या विकासासाठी काम करते. मॅजिक बस चे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे सर, तालुका समन्वयक,दिनेश कामतवार सर,


योगिता सातपुते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली चामोर्शी तालुक्यातील मकेपल्ली या गावात  जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आले.


जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व : - 


आजकाल भारतासह संपूर्ण जगभरात प्रदूषण वेगाने वाढत आहे. याचे आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. पशु पक्षी नष्ट होत आहे, उन्हाळ्यात पावसाळा. पावसाळ्यात उन्हाळा. आशा प्रकारे ऋतू बद्दलतांना आपल्याला दिसून येत आहे, वाढत्या प्रदूषणापासून निसर्गाचे सरंक्षण करण्यासाठी पर्यावरण दिन सर्वत्र साजरा केला जातो. 


या दिवशी लोकांना निसर्गाचे आपल्या आयुष्यात काय महत्त्व असते हे सांगून, पर्यावरणाची काळजी कशी घ्यावी या बद्दल सूचित केल्या जाते. पर्यावरण प्रदूषित होण्यापासून वाचवण्यासाठी लोकांना प्रवृत्त केले जाते. अशाप्रकारे विध्यार्थ्यांना पर्यावरण दिनाचे महत्त्व सांगून, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे, प्रश्नमंजुषा स्पर्धा, भाषण स्पर्धा, इत्यादी स्पर्धेचा आयोजन करण्यात आले.


सोबतच विजयी व सहभाग स्पर्धकास  शैक्षणिक वस्तू  बक्षीस स्वरूपात देण्यात आले. तसेच या कार्यक्रमाला श्री संजय वाकडे जी, मालुताई संदीप भोवरे,जयश्री ताई प्रवीण भोवरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी गावातील युवती उर्वशी गव्हारे, व मॅजिक बस संस्थेचे युवा मार्गदर्शक किशोर किनेकार यांनी आपल्या अथक परिश्रमाने हे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !