कुणबी समाज एकवटला तरच आमची प्रगती. - खासदार,प्रतिभाताई धानोरकर
★ व्याहाड (खुर्द) कार्यक्रमात कुणबी समाज एकत्र संपूर्ण ब्रम्हपुरी क्षेत्रात एक व्हा आवाहन.
मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक
सावली : चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रासाठी कुणबी समाज एकवटल्या मुळे माझा विजय झाला.अशीच एकजुट ठेवली तर चिमुर लोकसभा निर्वाचन क्षेत्रातील विधान सभेच्या 6 ही जागेवर विजय आमचाच आहे.
तेव्हा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातही आपल्या एकजुटीची ताकद दाखवा.माझ्या निवडणुकीत मला तिकीट भेटू नये म्हणुन आमच्यातलेच नेते माझा विरोध करीत होते.परंतु तुमच्या एकजुटी च्या ताकतीने अडीच लाखाची आघाडी घेऊन मी निवडून आलो अशीच एकजुट कायम ठेवा असे आवाहन व मार्गदर्शन व्याहाड (खुर्द) येथील कुणबी समाजाच्या मेळाव्यात सत्काराप्रसंगी बोलत होते.
व्याहाड (खुर्द)येथील गडम्मवार सभागृहात कुणबी समाज मेळाव्यात नवनिर्वाचित खासदार, प्रतिभाताई धानोरकर यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी राष्ट्रवादीचे नेते ॲड. संजय ठाकरे तर मंचकावर कांग्रेसचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे,भाजपाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष,प्रशांत वाघरे,कांग्रेसच्या सावली महिला तालुकाध्यक्ष,उषा भोयर,माजी जि.प.सदस्य,वैशाली शेरकी,माजी जि.प.सदस्य, प्रमोद चिमुरकर.ॲड.गोविदराव भेंडारकर, कुणबी समाज सघटना चे सावली तालुकाध्यक्ष,अर्जुन भोयर,खेमदेव चापले,कविंद्र रोहणकार,रमेश म्हशाखेत्री,उरकुडे गुरुजी वासुदेव सौदळकर' बोबाटे , आदि उपस्थित होते.
अध्यक्ष स्थानावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते ॲड.संजय ठाकरे म्हणाले की गेल्या १० वर्षात ब्रम्हपुरी क्षेत्राचा विकास झाला नाही. व्याहाड खुर्द ते गांगलवाडी रस्ता हवेतच विरला.
कुनबी समाजाच्या ठेकेदारांना त्रास देण्याचे काम सुरु आहे.यापुढे कुणबी समाजाचा व ब्रम्हपुरी क्षेत्राचा विकास करायचा असेल तर कुनबी समाजांनी एकवटून एकत्र येण्याची गरज आहे.कार्यक्रमाचे संचालन,चंचल रोहणकर यांनी मानले.मेळाव्यात ब्रम्हपुरी,गडचिरोली, सावली,तालुक्यातील नागरिकांची प्रचंड गर्दी होती