डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे शिलेदार अखेर पोहचले लोकसभेत.
मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक
गडचिरोली : बाबासाहेब आंबेडकरांची धम्मभुमी महाराष्ट्रात रिपाई ,वचित 'पिरिपा आठवले गर आदि सहीत सतरासे साठ पार्ट्या आहेत.त्या वेगळगळ्या गटातटात असुन कधिच स्वतंत्रपणे आपल्या बलबुत्यावर निवडून येत नाहीत.
परंतु २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भीम आर्मी पार्टीचे ॲड . चंद्रशेखर आझाद (रावण ) वय वर्ष 3७ हे उत्तरप्रदेशातून नागीना या लोकसभा मतदार संघातून आपल्या मेहनतीवर , स्वतः च्या बलबुत्यावर कोणत्याही पक्षासी समझोता न करता ५१ . २ % पाच लाखाच्या वर मतदान घेऊन प्रचंड बहुमतांनी निवडून आलेत. तर दक्षिण भारतातील तामिलनाडू येथून लिबरेशन पॅथर्स या पक्षाचे चिंदम्बरम या
मतदार संघातून डॉ.थोल.थिरुवलवलन व विलिपुरम मतदार संघातून रविकुमार डी हे दोन्ही तामीलनाडू या स्टेट मधून स्वतंत्रपणे निवडून आलेत . हेच खरे बाबासाहेब आंबेडकराच्या विचारांचे शिलेदार ठरले ' महाराष्ट्रातील आर.पी.आय.नेते बाकी फुस,हे तिन्ही खासदार संसदेत आवाज उठविणार.