गडचिरोली येथे बामसेफ च्या सभेत विविध विषयावर चर्चा.
एस.के.24 तास
गडचिरोली : स्थानिक इंदिरा गांधी चौकातील रेस्ट हाऊस मध्ये बामसेफच्या जिल्हास्तरीय सभेत श्रीकांत दादा होवाळ बहुजन मुक्ती पार्टी प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनात विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
तसेच विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली . श्रीकांत दादा होवाळ प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य बहुजन मुक्ती पार्टी म्हणाले की,सध्याचे सरकार हे बहुजन विरोधी आहे.त्यामुळे बहुजन समाजाने जागृत होऊन आपल्या हक्क आणि अधिकारासाठी लढाई लढणे आवश्यक आहे.अशा सरकार पासून दूर राहिले पाहिजे त्यांना मत देऊ नये.
बहुजनांच्या मतांच्या आधारावर सरकार स्थापन करतात परंतु बहुजनावरच अन्याय करतात.आजपर्यंत त्यांनी सरकारी नोकऱ्या संपविल्या,आरक्षण संपविले, खाजगीकरण करून मुठभर लोकांच्या हातात सत्ता दिली .पेंशन बंद केली.सेवानिवृत्त लोकांना मानधनावर नोकरी देतात परंतु सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी देत नाही. याची जाणीव बहुजन समाजाला होणे आवश्यक आहे.
ओबीसींची जातनिहाय जनगणना करत नाही, आदिवासींचे विस्थापन केले जात आहे,अल्पसंख्याकांना सुद्धा आरक्षण मिळत नाही,अशा विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
या सभेत विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली .लोकसभा अध्यक्ष,प्रमोद बांबोळे,गडचिरोली विधानसभा अध्यक्ष,तुळशीराम सहारे,प्रभारी प्रमोद बांबोळे , सहाय्यक प्रभारी नितीन पदा,आरमोरी विधानसभा अध्यक्ष कामराज लोखंडे ,प्रभारी दीपक मेश्राम , त्याचप्रमाणे अहेरी विधानसभा अध्यक्ष नितीन पदा , प्रभारी शंकर अलोणे,सहाय्यक प्रभारी,सुरेश दुर्गे यांची नियुक्ती करण्यात आली.
आता पुढे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी बहुजन मुक्ती पार्टी आपले उमेदवार उभे करणार आहे . त्यासाठी आपला उमेदवार निवडणे ,बुध बांधणी करून आपला उमेदवार निवडून आणणे व विधानसभेत पाठवण्यासाठी तयारी सुरू आहे.
या सभेला भोजराज कान्हेकर बामसेफ जिल्हाध्यक्ष , यज्ञराज जनबंधू प्रोटन कोषाध्यक्ष,प्रमोद राऊत एमएन टीव्ही चॅनेल पत्रकार,नरेश बांबोळे बामसेफ सचिव , मनोज खोब्रागडे कार्याध्यक्ष बामसेफ,जनार्धन ताकसांडे जिल्हाध्यक्ष,भारत मुक्ती मोर्चा,प्राध्यापक अशोक वंजारी जिल्हाध्यक्ष,आरएमबीकेएस,
अमर खंडारे जिल्हाध्यक्ष, बहुजन मुक्ती पार्टी,सुनंदा बांबोळे राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ,वर्षा कन्नाके राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद प्रतिक वनकर, राकेश देवले,राजेंद्र मडावी,दिलीप नंदेश्वर ,गणेश नंदेश्वर सुशिक्षित बेरोजगार मोर्चा,पी.एल .रामटेके,राजेंद्र लाकडे,डोमा गेडाम सचिव बहुजन मुक्ती पार्टी,इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते .