गट ग्रामपंचायत कोटमी भसमटोला - नवेगाव गावात विद्युत खांब पोहचले परंतु डिपी नाही.
मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक
एटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील कोटमी गट ग्रामपंचायत मधे भसमटोला व नवेगांव गावे येतात.गेल्या १ वर्षापासून सदर गावात विघुत खांब पोहचले परंतु लाईनच सुरु नाही.अजुन पर्यंत डिपी चा पत्ताच नाही.या महावितरण कंपणीच्या भोंगड कारभारामुळे येथील नागरीक त्रस्त झाले असुन भसमटोला नवेगांव गावातील अंधार कधि दुर होणार या प्रतिक्षेत ग्रामस्थ वाट बघत आहेत.
कोटमी व परिसरातील विद्युत लाईन गेला एक महिन्यापासून लंपडाव नव्हे सततच बंद राहत असल्यामुळे आटाचक्की सेतू केंद्राची कामे कास्तकारांची कामे होत नाहीत.कसनसुर येथे महावितरणाचे कार्यालय आहे परंतू तिथे कर्मचारी नाहीत.कोटमी गावात लाईनमॅन चा पत्ताच नाही.आता तर वादळी वारा झाडे विदयुत लाईनवर कोसळतात अशा बाहाना सांगायला महावितरण कंपणी मोकडी झाली आहे.
दुर्गम भागाकडे कोणतेही कर्मचारी लक्ष देत नाही त्यामुळे कोटमी परिसरातील नागरीक विद्युत लाईन अभावी त्रस्त झाले आहेत.