ने.हि.महाविद्यालयात छत्रपती शाहू महाराज जयंती उत्सव.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,२६/०६/२४ येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती उत्सव कार्यक्रम घेण्यात आला.सर्वप्रथम प्राचार्य डॉ डी एच गहाणे व उपप्राचार्य डॉ सुभाष शेकोकर यांनी महाराजांच्या फोटोला माल्यार्पण करुन अभिवादन केले. यावेळी छत्रपती शाहू महाराज की जय ! ,भारत माता की जय ! असा जयघोष करण्यात आला.
या नंतर डॉ राजेंद्र डांगे, गुरुनानक महाविद्यालय बल्लारपूरचे डॉ.भास्कर बहिरवार,डॉ,शोभा गायकवाड, अधीक्षक संगीता ठाकरे, )पर्यवेक्षक प्रा.आनंद भोयर, डॉ रतन मेश्राम, शांताबाई महिला महाविद्यालयाच्या डॉ हर्षा कानफाडे,रुपेश चामलाटे,रोशन डांगे,प्रज्ञा मेश्राम इ.नी महाराजांच्या फोटोला पुष्प वाहून अभिवादन केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ .कुलजित शर्मा,डॉ धनराज खानोरकर,प्रा.धिरज आतला,जगदिश गुरनुलें नी परिश्रम घेतले.