पी.एस.आय.राकेश अल्लीवार समाज भूषण पुरस्काराने सन्मानित


पी.एस.आय.राकेश अल्लीवार समाज भूषण पुरस्काराने सन्मानित


सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक


मुल : 31 मे राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती चे औचित्य साधून जुनासुर्ला येथे इयत्ता 10 वी, इयत्ता 12 वी,नवनियुक्त समाज अध्यक्ष,गाव प्रमुख,उपप्रमुख,धनगर समाज कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सचिव तसेच पी.एस.आय. राकेश आणि त्यांचे आई - वडील  यांचे जाहीर सत्कार करण्यात आले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.माणिक पाटेवार - अध्यक्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जुनासुर्ला,उद्घाटक म्हणून श्री,बिराजी कंकलवार धनगर /कुरमार समाज अध्यक्ष,सह उद्घाटक म्हणून श्री,मल्लाजी कोरीवार - गाव प्रमुख,श्री जानुजी मिडपलवार,सौ बोन्ताबाई कन्नावार - माजी सरपंच, सौ.श्वेताताई रामेवार माजी सरपंच,सौ. सरिकाताई भुमलवार- सदस्य ग्रा.पं.श्री,मल्लाजी पाटेवार, श्री,मुखरूजी कोमावार,श्री,बंडुजी अल्लीवार,श्री पोचूजी येग्गेवार,श्री,मुखरुजी पाटेवार,श्री,आसुजी चिठ्ठावार,श्री, तुळशीदासजी भगतवार,श्री मुकेश इन्मुलवार,श्री,गौरव  रामेवार आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. 

सर्व प्रथम राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून,दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते इयत्ता 10 वी इयत्ता 12 वी तील गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शिल्ड व प्रमाणपत्र सत्कार करण्यात  आले. 


तसेच मंचावर उपस्थित मान्यवरांना सुद्धा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. एम.पी.एस.सी.परीक्षा उत्तीर्ण होऊन पी.एस.आय पदी निवड झालेले श्री.राकेश यास " समाजभूषण " पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच त्यांचे आई - वडिलांना सुद्धा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.पी.एस.आय राकेश याने मनोगत प्रसंगी जिद्द,चिकाटी आणि परिश्रम करण्याची तयारी असेल तर जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही असे अनमोल विचार  व्यक्त केले. 


कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन श्री.मुकेश मद्रिवार शिक्षक यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार श्री.मनोज कोमावार,संख्यिकी सहाय्यक सिंदेवाही यांनी मानले.


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जय मल्हार सेनेचे सदस्य श्री.किशोर सूरेवार,भीमराव धुडेवार,परशुराम रामेवार,शंकर देवलवार,गणेश ईदुलवार,गंगाधर धुडेवार, रामुजी कोरेवार,श्री दिलीप भूमलवार,श्री प्रकाश इनमुलवार आणि दिनेश रामेवार आणि गावातील समाज बांधवानी सहकार्य केले.


शब्दांकन : - श्री.मुकेश मद्रीवार शिक्षक - शिवाजी विद्यालय गडचिरोली.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !