इंडिआ आघाडीतील घटक पक्ष कांग्रेसच्या उमेदवारांवर नाराज
घटक पक्ष आम्ही भाडोत्री आहोत काय ? - माजी आमदार,रामकृष्ण मडावी
मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक
आरमोरी : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडनुकीत चिमुर लोकसभा निर्वाचण क्षेत्राची उमेदवारी इंडिआ आघाडीतून कांग्रेसचे डॉ.नामदेव किरसान यांना दिली.आघाडीत कांग्रेस ' शिवसेना (उद्धव ठाकरे ) गट राष्ट्रवादी शरद पवार गट व आर.पि.आय आदिच्या प्रमुख नेत्यांनी कांग्रेसचे डॉ.नामदेव किरसान यांना सहकार्य करून सभा गाजवून आघाडीतील घटक पक्षानी जिवाचे रान करून कांग्रेसचे डॉ.नामदेव किरसान याना प्रचंड मतानी निवडून आणले.
कांग्रेसचे डॉ.नामदेव किरसान चा विजय हा केवळ कांग्रेसचा विजय नसुन आघाडीत शिवसेना,राष्ट्रवादी कांग्रेस,आर.पि.आय ची महत्वाची भुमीका आहे.त्यामुळे डॉ.किरसान यांना भरघोष यश प्राप्त झाले.परंतु केवळ आणि केवळ कांग्रेसच अशा प्रकार सुरु झाला असून होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीत गडचिरोली जिल्ह्यातील आमदारकी च्या तिन्ही जागा कांग्रेसच लढविणार असेही अभिनंदन सभेत कांग्रेस सांगत आहे.
आरमोरी विधानसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहीला असुन याच क्षेत्रातून शिवसेनेचे तिनदा आमदार निवडून आलेले आहेत.तेव्हा कांग्रेसने याचे भान ठेवावे.आम्ही तन,मन,धनानी कांग्रेसच्या उमेदवारांना निवडून आणणारे मित्र पक्ष भाडोत्री आहोत काय ? असा सवाल उबाठा शिवसेना गटाचे माजी आमदार डॉ.रामकृष्ण मडावी व त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी उपस्थित केले आहे.