गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राची जागा हरल्यास,तर राजकारणातून संन्यास घेणार अशी घोषणा विधानसभेचे विरोधी पक्षनेते,विजय वडेट्टीवार यांनी केली.

गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राची जागा हरल्यास,तर राजकारणातून संन्यास घेणार अशी घोषणा विधानसभेचे विरोधी पक्षनेते,विजय वडेट्टीवार यांनी केली.



एस.के.24 तास


गडचिरोली : महाराष्ट्र राज्यासह देशभर भाजप विरोधी वातावरण असताना " एक्झिट पोल " चे आकडे म्हणजे ‘" दाल में कुछ काला है " असे असून गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राची जागा हरल्यास राजकीय सन्यास घेणार,अशी घोषणा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.


गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत वडेट्टीवार म्हणाले की, इंडिया आघाडी विदर्भात 10, तर राज्यात 35 जागा जिंकेल.प्रचारादरम्यान आम्ही घेतलेल्या सभांना लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.परंतु सत्ताधाऱ्यांना आनंदी करण्यासाठी ‘" एक्झिट पोल " चे आकडे भाजपच्या समर्थनार्थ दिले गेले. मतमोजणीस उशीर झाला तरी चालेल, मात्र " सी-१७ फॉर्म " आणि मशिन बरोबरच लावून येणाऱ्या फॉर्मची आकडेवारी जुळल्याशिवाय एव्हीएम मशिन उघडली जाऊ नये,अशी सूचना आपण केल्याची माहिती ही वडेट्टीवार यांनी दिली.


निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांना नोटीस बजावली.परंतु भाजप ही निवडणूक धार्मिक मुद्यांवर लढत असताना आयोग गप्प का होता,एका मतदारसंघात मतदान सुरू असताना बाजूच्या मतदारसंघात प्रचार सभा घेतल्या गेल्या, तो आदर्श आचारसंहितेचा भंग नाही का,असे प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केले.


गडचिरोली-चिमूर क्षेत्रातील निवडणूक ही लोकांनीच हातात घेतली होती.लोकांमध्ये सत्ताधाऱ्यांविरुद्ध प्रचंड राग होता. असे असतानाही " एक्झिट पोल " भाजपच्या बाजूने कौल दाखवत असेल, तर " दाल में कुछ काला है " असे समजण्यास भरपूर वाव आहे आणि ही निवडणूक काँग्रेस पक्ष हरला तर राजकीय संन्यास घेऊ, अशी घोषणाही वडेट्टीवार यांनी केली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !