पंचायत समिती,सावली येथे विविध विकास कामांसंदर्भात आढावा बैठक ; विरोधी पक्षनेते,विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती.
एस.के.24 तास
सावली : दिनांक,१० जुन २०२४ ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील सावली तालुक्यातील विविध विकास कामांना गती प्राप्त होण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी प्रशासकीय स्तरावर आवश्यक योग्य व शीघ्र पाठपुरावा करून नियोजना हेतू सावली येथील पंचायत समिती कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली.
आयोजित आढावा बैठकीस अध्यक्ष म्हणून राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार,माजी बांधकाम सभापती जि.प.चंद्रपूर मा.दिनेश पाटील चिटणुरवार, तहसीलदार चिरडे मॅडम,ठाणेदार जीवन राजगुरु,तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष नितीन गोहने, माजी पंचायत समिती सभापती मा.विजय कोरेवार,वैद्यकीय अधिक्षक डॉ.बंडू रामटेके तसेच सर्व विभागाचे अधिकारी,काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी तालुक्यातील विविध विकास कामांबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली.कामांना जलद गतीने पाठपुरावा करून तातडीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे असे निर्देश यावेळी राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित महसूल व वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
तालुक्यातील लोकांना या पूर्णत्वास आलेल्या विकास कामांमुळे सर्व सोयीचे होईल,प्रशासनाने लवकरात लवकर विकास कामाना गती द्यावी असा आशावाद याप्रसंगी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. यावेळी प्रशासनाचे सर्व विभागाचे अधिकारी काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच नगरपंचायतीचे नगरसेवक प्रामुख्याने उपस्थित होते.