चिमुर येथे कंत्राटी अभियंत्यासह दोघांना अटक ; घरकुल च्या अनुदानासाठी लाभार्थ्याला मागितली लाच.
पुंडलिक गुरनुले - चिमुर तालुका प्रतिनिधी
चिमुर : चिमूर (चंद्रपूर): शबरी आवास योजनेतून घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्याला तिसऱ्या व चौथ्या टप्प्यातील अनुदान जमा करून देण्यासाठी २० हजारांची लाच मागणाऱ्या कंत्राटी अभियंत्यासह दोघांना रंगेहाथ अटक करण्यात आली.
ही कारवाई चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी चिमूर च्या पंचायत समिती कार्यालयात केली.कंत्राटी अभियंता मिलिंद मधुकर वाढई वय,27 वर्ष व आशिष कुशाब पेंदाम अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
चिमूर तालुक्यातील कळमगाव येथील रोजमजुरीचे काम करणाऱ्या लाभार्थ्याला शबरी आवास योजनेअंतर्गत २०२२-२३ या आर्थिक वर्षात घरकुल मंजूर झाले होते. घरकुल बांधकामासाठी तक्रारकत्याला चार टप्प्यात अनुदानाची रक्कम जमा होणार होती. त्यापैकी दोन टप्प्यात ६५ हजार रुपये जमा झाले. तर तिसरा टप्पा ४५ हजार चौथा टप्पा २० हजार जमा करण्यासाठी चिमुर येथील पंचायत समिती कंत्राटी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता,मिलिंद वाढई याने २० हजाराची लाच मागितल्याची तक्रार प्रतिबंधक कार्यालकडे प्राप्त झाली होती.
तक्रारी वरून बुधवारी केलेल्या पडताळणी कारवाई मध्ये आरोपी,मिलिंद वावई याने तक्रारदाराला लाचेची मागणी करून तडजोडीअंती १० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.तसेच पडताळणी कारवाई दरम्यान आरोपी सोबत त्याचा मित्र आशिष कुशाब पेंदाम याने तक्रारदारला लाचेची रक्कम देण्याकरिता प्रोत्साहित केल्याचे निष्पन्न झाले.
सापळा कारवाई दरम्यान आरोपी,मिलिंद मधुकर वाढई याने स्वतः लाचेची रक्कम स्वीकारल्याने व त्याचा मित्र आशिष कुशाब पेंदाम या दोघांना ताब्यात घेऊन तपास केला जात आहे. ही करवाई " एसीबी " च्या नागपूर विभागाचे पोलीस उपायुक्त, राहुल माकणीकर,अप्पर पोलीस अधीक्षक,संजय पुरदरे,चंद्रपूर च्या पोलीस उपअधीक्षक मंजूषा भोसले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, संदेश वाघमारे, वैभव गाडगे, राकेश जांभूळकर व चालक सतीश सिडाम यांच्या पथकाने केली.