शिवराज मालवी यांना शौर्य पुरस्कार.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक.
ब्रम्हपुरी : दिनांक,२६/०६/२४ ग्राम विकास शिक्षण संस्था पारडगाव तालुका ब्रम्हपुरी द्वारा संचालित ज्ञानगंगा विद्यालय, बेटाळा व ज्ञानगंगा विद्यालय हळदा , दोन्ही विद्यालयाची सहविचार सभा तथा आढावा बैठक रविवार दिनांक 23 जुन 2024 ला ज्ञानगंगा विद्यालय बेटाळा येथे आयोजित करण्यात आली.
सभेमध्ये दोन्ही शाळेतील एस. एस. सी. परिक्षेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणारे शाळेतील विद्यार्थी व त्यांचे पालक यांचा शाल, श्रीफळ, स्मृती चिन्ह व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.तसेच शैक्षणिक, सामाजिक, पत्रकारीता व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे सेवानिवृत्त शिक्षक व जलतरणपटू शिवराज मालवी यांना ग्राम विकास शिक्षण संस्थे द्वारा शौर्य पुरस्कार प्रदान करुन गौरविण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रमोदजी तोंडरे,सचिव राजेश्वरजी विधाते, सदस्य पत्रे,मैद व सर्व सदस्य तथा शाळेचे मुख्याध्यापक विष्णुजी तोंडरे, ठाकरे व दोन्ही शाळेतील शिक्षक शिक्षीका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
शिवराज मालवी यांना शौर्य पुरस्कार मिळाल्याबद्दल त्याचे उपस्थितांनी तसेच मित्र मंडळ व आप्तगण यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.