छत्रपती शाहुशी महाराज यांना आरक्षणा पेक्षा जातीय वाद नष्ट करण्यावर भर दिला. - डॉ.सविता सादमवार
★ छत्रपती शाहुश्री महाराज यांची जयंती साजरी.
गडचिरोली मुनिश्वर बोरकर
गडचिरोली : आज बहुजन समाज भटकलेला आहे. त्यांना भारतीय समाजात मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर संविधानावर भर दिला पाहिजे.
संविधान हा आमचा प्राण आहे कारण चंद्र - सुर्य कितीही झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला तरीही ते लपवू शकत नाही त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेला संविधान बदलु शकणार नाही कारण बाबासाहेब आंबेडकर अजरामर आहेत. शाहु महाराज यांनी आरक्षणावर भर न देता जातीयवाद नष्ट करण्यावर भर दिला.
यांचे कार्य महान आहे म्हणुन शाहश्री महाराज यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली पाहीजे कारण महाराज्याचे उपकार बहुजन समाजावर फार आहेतअश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली च्या प्राध्यापिका डॉ. सविता सादमवार यांनी वंचित बहुजन आघाडी तर्फे आयोजीत छत्रपती शाहुश्री महाराज यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाप्रसंगी केले. वंचित आघाडीच्या वतीने प्रेस क्लब गडचिरोली येथे छत्रपती शाहुश्री महाराज यांची १५० वी जयंती साजरी करण्यात आली.
यात वंचितचे जिल्हाध्यक्ष बाळू ठेभुर्ण हे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.प्रा.सविता सादमवार तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन रिपब्लिकन पार्टी चे जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर ' वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष जि. के. बारसींगे , महिला अध्यक्षा प्रज्ञा निमगडे , महासचिव योगेंद्र बागरे , विलास केळझरकर , तुळसिराम सहारे , माला भसगवळी आदि लाभले होते. याप्रसंगी प्रा. मुनिश्वर बोरकर म्हणाले की कांग्रेस - बिजेपी संविधान बचाव संविधान हटाव यातच एस.सी.समाजाला मुर्ख बनवित राहीले.
दोन्ही पक्ष एकच माळेचे मनी आहेत त्यामुळे बहुजनांनी वंचितकडे वळावे उद्याचे भविष्य वंचित कडे आहे. बाळू ठेभुर्णे अध्यक्ष पदावरून वंचितचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेला ठराव वाचून दाखविला व तो ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला.याप्रसंगी प्रसाद प्रल्हाद म्हशाखेत्री यांचेही समायोचित भाषण झाले . कार्यक्रमाचे संचालन भिमराव शेन्डे यांनी तर आभार जि. के.बारसिंगे यांनी मानले.
कार्यक्रमास मंदाताई तुरे,जया रामटेके,ठेभुर्णे ठेकेदार ,भोजुभाऊ रामटेके,शुशीला डोंगरे,प्रेम झगजकी,प्रभाकर रोहणकर,लहुकुमार भैसारे सहीत बहुसंख्य वंचितचे कार्यकर्ते उपस्थित होते .