चंद्रपूर च्या बाबूपेठ परिसरात अनेक समस्या व अडचणी;जनसामान्यांच्या समस्या जाणून घेतल्या बहुजन समता पर्वाच्या आयोजकांनी

चंद्रपूर च्या बाबूपेठ परिसरात अनेक समस्या व अडचणी;जनसामान्यांच्या समस्या जाणून घेतल्या बहुजन समता पर्वाच्या आयोजकांनी


किरण घाटे - प्रतिनिधी चंद्रपूर


चंद्रपूर : चंद्रपूर शहरासह  बाबूपेठ  येथील स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून प्रशासन आणि राजकीय प्रतिनिधी  त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे बाबूपेठ स्थित बोधिसत्व विहारामध्ये माजी नगरसेवक  राजेश उके यांनी बाबूपेठ परिसरातिल समस्यांचे निवारण सामाजिक पातळीवरून करण्याच्या दृष्टीकोनातून आणि भेडसावणाऱ्या समस्या व अडचणी जाणून घेऊन त्यांचे निवारण करण्याच्या हेतूने  बहुजन समता पर्वाचे आयोजक डॉ.दिलीप कांबळे  आणि डॉ.संजय घाटे  यांच्या मार्गदर्शनाखाली एका सामाजिक कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते.


सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन माजी नगरसेवक राजेश उके यांनी केले या वेळी उपस्थित पाहुण्यांना परिचय करून देत येथील समस्यांवर प्रकाश टाकला तदवतचं सामाजिक कार्यकर्त्यांकडून बाबूपेठ तथा शहरातील समस्या मांडण्याचे एक निवेदन तयार केले.


सामाजिक कार्यकर्त्यांकडून समस्या मांडल्या जात असतांना असे दिसून आले की चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये जवळजवळ दोन वर्षापासुन प्रशासन राज असल्यामुळे आणि प्रशासकावर अंकुश नसल्यामुळे तसेच प्रशासक सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले झाले असल्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये मनमानी कारभार सुरू असल्याचा बैठकीत सूर निघाला.


तसेच लोकसभेच्या निवडणूकीचे कारण सांगुन प्रशासन बाबूपेठसह शहरातिल समस्यांना बगल देत असल्याचे लोक चर्चेतून दिसून आले.


चंद्रपूर शहरात जवळजवळ ४५ झोपडपट्ट्या आहेत.सर्व झोपडपट्ट्याचे सर्वेक्षण झाले आहे मात्र राजकीय आणि प्रशासकीय अनास्थेमुळे नागरिकांना अजूनपर्यंत स्थायी पट्टे देण्यात आले नसल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. स्थायी पट्टे मिळवून घेण्याकरिता नियोजनबद्ध आंदोलन करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले.दरम्यान स्थायी स्वरूपाचे पट्टे नसल्यामुळे त्यांना घरकुल मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सुर दिसून आला.


या पार पडलेल्या बैठकीत प्रामुख्याने काही प्रमुख व महत्त्वाच्या समस्या समोर आल्यात त्या अश्या :-


१) बाबूपेठ मधील जटिल बनलेला बाबूपेठ उड्डाणपूल हा ऐरणीचा विषय असून त्याचे कासवगतीपेक्षाही धिम्म गतीने काम सुरू असल्याचे नागरिक हैराण झाले आहेत त्याचे तात्काळ निवारण होणे गरजेचे आहे.

२) अमृतजल योजनेअंतर्गत नालीखोदकाम समान पातळीवर गेले असल्याने काहींना खूपच तर काहींना काहीच पाणी मिळत नसल्याने पाण्याचे योग्य नियोजन करावे

३) स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या दृष्टीकोनातून मेन लाईनला जोडणाऱ्या वस्तीमधील नाल्या उघड्या न ठेवता नाल्यांचे बांधकाम अंडरग्राऊंड करावे

४) प्री पेड-पोस्ट,पोस्ट मीटर चा विरोध करण्यात यावा.

५) बाबूपेठ येथे सुसज्ज पोलीस चौकीची निर्मिती व्हावी

६) शिक्षणात मनुस्मृती शिक्षण लागू करण्यास विरोध करण्यात यावा

७) अमृतजल मिशन योजनेसाठी खोदलेल्या नाल्यावरील अजूनही सिमेंट क्राक्रिटिकरण झाले नाही

८) शहरातील अतिक्रमण काढत असतांना मोठे मासे सोडून हातावर पोट असणाऱ्यावर अन्याय होणार नाही याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे देखील मुद्दे बैठकीत चर्चिल्या गेलेत.यासह अन्य अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत.या समस्यांवर राजेश नकले यांनी आपला आवाज बुलंद उठवत त्या तातडीने सोडविण्याची या वेळी मागणी केली.


बहुजन समता पर्वाचे आयोजक डॉ. संजय घाटे यांनी आलेल्या समस्यांचे शासकीय आणि प्रशासकीय पातळीवरून निवारण करण्याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले.तर बहुजन समता पर्वाचे निर्माते डॉ.दिलीप कांबळे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना सदरहू सर्व समस्या सामाजिक मंचावर सोडवण्यासाठी आम्ही बहुजन समता पर्वाच्या माध्यमातून कटिबद्ध आहोत असे सुचोवात केले. 


त्यासाठी नियोजनबद्ध कालबद्ध कार्यक्रम आयोजित करावा लागेल आणि जनतेला आपल्या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी रस्त्यावरच्या लढाईसाठी पुढे यावे लागेल.आपण आपली ताकत दाखविल्याशिवाय आपल्या मागण्या आपल्या पदरात पडणार नाहीत त्यासाठी आपण जमिनीवरील लढाईसाठी सिद्ध झाले पाहिजे असे डॉ.दिलीप कांबळे  या वेळी म्हणाले.


कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन गौतम गेडाम यांनी केले.आयोजित या छोट्याखानी बैठकीला सामाजिक कार्यकर्ते पितांबर कश्यप  महानंदा वाळके ,अक्षय बोबडे,जितेंद्र डोहणे,संजय मेश्राम,शशिम पाटील,संजय बुरडकर,गुंजन ,पिंटू मुन,कुरेशी ,संजय कासवटे,पियुष दुपे यांच्यासह स्थानिक सामाजिक कार्यकर्ते  उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !