वृक्ष संवर्धन काळाची गरज. - रवींद्र मुप्पावार
★ विश्वशांती विद्यालयात जागतिक पर्यावरण दिन साजरा
एस.के.24 तास
सावली : भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथे शालेय परिसरात वृक्ष लागवड करून ०५ जुन हा दिवस जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा करण्यात आला.
वाढत्या तापमानातील बदल हा मानवाच्या अतिरेकामुळे व अहंकारामुळे निर्माण होत आहे याचा थेट परिणाम पर्यावरणावर होत असून त्याचा ऱ्हास होत आहे. पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याची गरज आहे.
संपूर्ण जगामध्ये औद्योगिकीकरणाचा विकास झाला असला तरी त्याची फार मोठी किंमत हवा आणि पाण्याच्या प्रदूषणाने आपल्या देशालाही मोजावे लागत आहे. वाढते शहरीकरण व औद्योगीकरण यांना कुठेतरी थांबवले पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व्हायला पाहिजे असे विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावाऱ बोलत होते.
यावेळी वृक्षारोपण प्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक सुधाकर मेश्राम,उच्च माध्यमिक शिक्षक राहुल आदे,धनंजय गुरनुले,भुजंग आभारे,शेखर प्यारमवार, संजय भोयर,अरविंद केळझरकर,रामचंद्र खिरटकर,दामोधर आदर्लावार,सुरेंद्र डोहणे,आदी कर्मचारी उपस्थित होते.