स्वच्छ व सुंदर शहर म्हणून ब्रम्हपुरी नावलौकिकास येणार.- विरोधीपक्षनेते,विजय वडेट्टीवार ★ ब्रम्हपूरी बसस्थानकाचे भुमीपुजन न.प.‌अंतर्गत २५ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण.


स्वच्छ व सुंदर शहर म्हणून ब्रम्हपुरी नावलौकिकास येणार.- विरोधीपक्षनेते,विजय वडेट्टीवार


ब्रम्हपूरी बसस्थानकाचे भुमीपुजन न.प.‌अंतर्गत २५ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक.


ब्रम्हपूरी : ३०/०६/२४ गेल्या १० वर्षांपासून मी या ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रतीनीधीत्व करत आहे.  येथील जनतेनी मला भरभरुन दिलेल प्रेम आणि दाखविलेला दृढ विश्वास याला तिळमात्रही तडा न जाऊ देता जनतेच्या अपेक्षांवर खरे उतरण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील. मतदारसंघातील जनसामान्यांच्या मुलभुत गरजांसह ब्रम्हपूरी शहराचा सर्वांगिण विकास साधून स्वच्छ व सुंदर शहर म्हणून भविष्यात ब्रम्हपूरी शहर नावलौकिकास येणार असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.ते ब्रम्हपुरी न.प.


अंतर्गत आयोजित पाणीपुरवठा योजनेच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते.आयोजित लोकार्पण सोहळ्यास प्रामुख्याने तहसीलदार उषा चौधरी, मुख्याधिकारी अर्शिया जुही, काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते देविदास जगनाडे, तालुकाध्यक्ष खेमराज तिडके, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जि.प.सदस्य डॉ. राजेश कांबळे, माजी नगराध्यक्षा रिता उराडे, न.प.माजी बांधकाम सभापती विलास विखार, शहर काँग्रेस अध्यक्ष हितेंद्र राऊत, माजी पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, माजी नप उपाध्यक्ष अशोक रामटेके, माजी नगरसेवक नितीन उराडे, माजी नगरसेवक बाला शुक्ला, माजी नगरसेवक सागर आमले, 


महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगला लोनबले, महीला काँग्रेसच्या शहराध्यक्षा योगिता आमले, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, काॅंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष मोंटु पिलारे, माजी न.प.उपाध्यक्ष बंटी श्रीवास्तव, बाजार समिती उपसभापती सुनीता तिडके, माजी नगरसेविका सरिता पारधी, माजी नगरसेविका निलीमा सावरकर, माजी नगरसेवक मनोज वठे, कृ.उ.बा.सदस्य किशोर राऊत, मुन्ना रामटेके, शहर काँग्रेस कार्याध्यक्ष सुधाकर पोपटे, अॅड.आशिष गोंडाणे,  कृउबा संचालक सोनू मेश्राम,


 अमित कन्नाके, महीला काँग्रेसच्या सुधा राऊत, सुशिला सोंडवले, अतुल राऊत, रवी पवार, प्रकाश खोब्रागडे, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष मोहसीन कुरेशी, अल्पसंख्याक शहराध्यक्ष सोहेल सयय्द यांसह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.


पुढे बोलतांना विरोधी पक्षनेते वडेट्टीवार म्हणाले की, गेल्या दशकापुर्वी विद्यानगरी ब्रम्हपुरीचा विकास खुंटला होता. मात्र मी येथील लोकप्रतीनिधी झाल्यानंतर कोट्यवधी रुपयांची विकासकामे करून विद्यानगरी ब्रम्हपूरी येथे खेळाडुंकरीता क्रिडा संकुल, जलतरण तलाव, प्रशस्त वातानुकूलित ईलायब्ररी, प्रशासकीय इमारत, अंतर्गत रस्ते, नाल्या, शुध्द पेयजल, वीज आदी सुविधा पुर्णत्वास आणल्या. तर आगामी काही दिवसांतच शहरात भुमीगत गटार लाईन, 


शहरातील तलाव दुरूस्ती व सुशोभीकरण, वीजडीपी, सुव्यवस्थित आठवडी बाजार, रेल्वे उड्डाणपूल, भुती नाल्यावर नवीन पुलाचे बांधकाम व शहरातील सांस्कृतिक वारसा जपणारे प्रशस्त असे वातानुकूलित सभागृह ही  प्रस्तावित कामे लवकरच पुर्णत्वास येणार आहेत असेही ते यावेळी म्हणाले.


ब्रम्हपूरी येथील बसस्थानक आधुनिकीकरणाच्या कामाचे भुमीपुजन : - 


गेल्या अनेक वर्षांपासून येथील बसस्थानकात सोयीसुविधांच्या अभावामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या विशेष प्रयत्नातुन ब्रम्हपूरी बसस्थानकाच्या आधुनिकीकरण व नुतनीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. या विकासकामाचे भुमीपुजन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते पार पडले. लवकरच हे बसस्थानक कात टाकणार असुन सोयीसुविधांचा लाभ येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लाभणार आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !