भररस्त्यात प्रेयसीची हत्या,मुलीला वाचवण्याऐवजी लोक व्हिडिओ काढण्यात लोक मग्न.
एस.के.24 तास
वसई : भर रस्त्यात एका प्रियकराने आपल्या प्रेयसीवर लोखंडी पान्याने वार करून हत्या केली. वसई पूर्वेच्या गावराई पाडा येथे मंगळवारी सकाळी ही घटना घडली. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरच बसून होता. त्याला वालीव पोलिसांनी अटक केली आहे.
नालासोपारा येथे राहणारा रोहित यादव वय,29 वर्ष आणि आरती यादव वय,22 वर्ष या दोघांचे मागील सहा वर्षांपासून प्रेम संबंध होते.मात्र आरती अन्य मुलाशी बोलत असल्याचा रोहित याला संशय होता.यावरून त्या दोघांमध्ये भांडणे होत होती. त्यामुळे रोहित संतप्त झाला होता. आरती वसईच्या एका कंपनीत कामाला लागली होती.
मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ती नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी निघाली होती. मात्र गावराई पाडा येथील स्टेट बँकेत समोर रोहितने तिला अडवले. दोघांची शाब्दिक बाचाबाची झाली. त्यावेळी रोहित ने आपल्या सोबत आणलेल्या लोखंडी पान्याने तिच्यावर सपासप वार केले.
आरती खाली कोसळली.काही वेळाने रोहित पुन्हा आला आणि त्याने तिच्यावर वार केले त्यात ती गतप्राण झाली.हत्येनंतर आरोपी रोहित तिथेच बसून राहिला वालीव पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपी रोहितला ताब्यात घेतले. मयत आरतीचे बारावीपर्यंत शिक्षण झाले असून एक महिन्या पूर्वीच ती कंपनीत कामाला लागली होती.
लोकं व्हिडीओ काढण्यात मग्न : -
सकाळची वेळ असल्याने रस्त्यामध्ये प्रचंड गर्दी होती.आरोपी यादव आरतीवर वार करत असताना लोकं व्हिडिओ काढण्यामध्ये मग्न होते.कोणीही तिला वाचवायला पुढे आले नाही. एक तरुण फक्त आरोपीला अडवायला पुढे होता. मात्र त्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. लोकं पुढे आली असती तर आरतीचे प्राण वाचले असते, असे पोलिसांनी सांगितले.