खा.डॉ.नामदेव किरसान यांनी केले वीज पडून मृत पावलेल्या कुटुंबाचे सांत्वन व आर्थिक मदत.

खा.डॉ.नामदेव किरसान यांनी केले वीज पडून मृत पावलेल्या कुटुंबाचे सांत्वन व आर्थिक मदत.


गडचिरोली - मुनिश्वर बोरकर


चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील गोवर्धन कुनघाडा रै येथील रहिवाशी गुरुदास मनिराम गेडाम यांचा  तळोधी वरून एक किमी अंतरावर असलेल्या वैनगंगा नदी घाटावर वीज पडून मृत्यू झाला होता. गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ नामदेव किरसान यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पिढीत कुटुंबाचे सांत्वन केले व स्वतःकडून आर्थिक मदत दिली. 

यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष,महेंद्र ब्राम्हनवाडे, काँग्रेसचे महासचिव विश्वजित कोवासे, शंकरराव सालोटकर, रजनीकांत मोटघरे, काँगेस कमिटीचे उपाध्यक्ष,अनिल कोठारे,रुपेश टिकले, माजी सरपंच अविनाश चलाख, नदीम नाथानी, विपुल ऐलावार, गौरव येंनगंटीवार , माजी जि प सदस्य पितांबर वासेकर, काँग्रसचे तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, राजेश ठाकूर, दिलीप उडाण, विठ्ठल दुधबळे, हरिभाऊ चापडे, अरुण किरमे, वसंत कुनघाडकर, प्रकाश पिपरे, साहिल वडेट्टीवार, रघुनाथ दुधे  व कुनघाडा रै क्षेत्रातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


मृत गुरुदास गेडाम हे नाव तयार करून दुरुस्त करणे व मच्छीमारी व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते 6 जून रोजी ते नातेवाईकाची बिघाड झालेली नाव दुरुस्त करण्यासाठी तळोधी वरून एक किमी अंतरावर असलेल्या वैनगंगा नदिघाटावर गेले होते अचानक वादळी पाऊस गारपीट विजांचा लखलखाट होऊन गुरुदास गेडाम व नीलकंठ भोयर यांच्या अंगावर वीज कोसळली गुरुदास हे जागीच गतप्राण झाले.


 तर नीलकंठ हा जखमी आहे मृत गुरुदास गेडाम यांना पत्नी व दोन मुले आहेत त्यापैकी एक मतिमंद आहे. पिढीत कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन खा.डॉ .नामदेव किरसान यांनी शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !