कर्मयोगी प.पु.तुकारामजीदादा गिताचार्य यांचे जीवन व कार्य

कर्मयोगी प.पु.तुकारामजीदादा गिताचार्य यांचे जीवन व कार्य 


पुंडलिक गुरनुले - तालुका प्रतिनिधी चिमुर 


चिमुर : संत तुकडोजी महाराजांच्या कार्याला व ग्रामगीता तत्त्वज्ञान साकार करण्याच्या कार्याला आयुष्याचा प्रतेक क्षण व रक्ताचा प्रत्तेक थेंब खर्च करुण सर्वस्व वहिलेले तुकारामदादा गिताचार्य हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची तंतोतंत आज्ञा पाळनारे होते. 

त्यांनी महाराजांच्या कार्याकरिता सर्वस्व त्याग करुण, घरा दारावर कायमचे तुळशीपत्र ठेउन तन मन धनासाहित सर्वस्व समर्पण झाले होते.अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ संस्थेचे आजीवन प्रचारक,लागोपाठ ९ वर्ष अविरोध निवडून येणारे सर्व सेवाधिकारी व संस्थापक सदस्य होते.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसोबत जपान देशात जाऊन त्यांनी सेक्रेटरी व दुभाशिकाचे काम केले होते.दादांनी भारताची पहिल्या वर्गाची रेल्वे पास मिळवुन सतत ५ वर्षे भारतातील सर्व राज्य व संस्था यांच्याशी गुरुदेव सेवा मंडळाचा संपर्क जोड़न्याचे कार्य केले होते. 


त्याकाळी दादांनी अकरावी मट्रिक शिक्षण पूर्ण करतांना योगाभ्यास,सर्व शास्त्राभ्यास प्राप्त करुण १८ तासात भगवत गीतेचे १८ अध्याय पाठांतर केले.स्वातंत्र्य संग्रामाच्या वेळी जेलमधे असतांना माजी राष्ट्रपति व्ही. व्ही.गिरी सारख्या अनेक देशभक्त यांना भग्वतगीता शिकवून गिताचार्य पदवी मिळवीली. 


अनवानी पायाने प्रसंगी ६० मैल पायी चालण्याचा उपक्रम करुण प्रसंगी शेंगदाने गुळ खाऊन रोज पाच गावाला गुरुदेव सेवा मंडलाच्या शाखा स्थापण केल्याशिवाय जेवायचे नाही असा निर्धार करुण भारतात गुरुदेव सेवा मंडलाच्या ४०,००० शाखांची निर्मिती केली.अ.भा. आदिम जाती शेवक संघ,भारत सेवा समाज,अ.भा.साधू समाज अशा अनेक संस्थांचे सदशत्व सांभाळून डॉ. बाबु राजेंद्र प्रसाद राष्ट्रपती असतांना भारतीय राज्य घटनेचे आमंत्रित सदश्य राहिले. 


ग्रामसभेला अधिकार मीळवून देण्याकरिता मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या टास्क फ़ोर्स समित्यांचे सदश्यत्व भूषविले. असे समाज परिवर्तानाचे महान क्रांतिकारी, अन्याय, अत्याचार,भ्रष्टाचार,अनिष्ट रुढी,वाइट व्यसने, शोसन, विषमता, लुचपतखोरी यांचे कट्टर वैरी तुकाराम दादांना राष्ट्रसंतांनी वयाच्या ५० वर्षे पर्यन्त गुरुदेव सेवा मंडल संस्थेच्या भौतिक व्यवहारात ठेउन नंतर त्यांचे कड़े मंडलाचे तत्वज्ञानाचे कार्य दिले. 


त्याकरिता त्यांना प्रथम अड्याळ टेकडी ता.ब्रम्हपुरी जिल्हा,चंद्रपुर येथे कोणतीही भौतिक व्यवस्था न करता अध्यात्म अवस्थेत १२ वर्षाच्या मौन साधनेत बसून दिले.दादा यांनी ही साधना पूर्ण करुण ग्रामगिता तत्वज्ञानाचे रणशिंग फूंकले व ग्रामगिता तत्वज्ञानाच्या रंगनात उतरले आणि सारखे वायु वेगाने ग्रामगितेचे अनेक भाषेत भाषांतर करविले. 


हिंदी,मराठी,संस्कृत,तेलगू भाषेत लहान मोठ्या ग्रामगिता प्रकाशित करुण त्या लागत खर्चाच्या किमतीत नफा व कमीशन वजा वितरित केल्या.विद्यापिठात राष्ट्रसंत विचारधारा सुरु केली,गावा गावात ग्राम सभा सक्षम करून गावगनराज्य स्थापन केले.गावाच्या हद्दीतील जल, जंगल, जमिन,खनिज आदि नैसर्गिक साधन संपत्ति गावाच्या ताब्यात मिलवून दिली. 


गावा गावात ग्राम संरक्षण दल स्थापन करून गावातील अन्याय, अत्याचार संपवीन्याची व्यवस्था केली.न्याय मंडल स्थापन करुन गावातच न्याय व्यवस्था केली.सेंद्रिय शेती,गौरक्षण,ग्रामोद्योग व कुटीर उद्योग करून गावातच कच्या मालाचा पक्का माल व्हावा याची कार्यदिशा दिली.


गोबरगैस,चरसंडास सुधारित बियाने आदि ला चालना देऊन रासायनिक खते रासायनिक औषदे याचा वापर बंद करून सावकाराच्या, बकेच्या दाढे तुन लोकांना सोड़विन्याकरीता ग्रामनिधी कोष, धान्य कोष, गावातच तैयार करून पैशाच्या गुलामितुन मुक्त करण्याचा मार्ग काढून दिला.


गावात आरोग्याच्या दृष्टिने निसोर्गोपचार केंद्र, शिक्षनाच्या दृष्टीने जीवन शिक्षण प्रणाली, गुरुकुल शिक्षनाच्या माध्यमातून मार्ग काढुन दिलेत.गुरुकुंज जवळील ९७ कोटीचा बांधून झालेला दारू कारखाना बंद केला,


अमरावती ला १ कोटि रु.चा बांधून झालेला पशु कत्तल खाना बंद केला.नागपुर विद्यापीठाला राष्ट्रसंतांचे नाव देणाऱ्या आंदोलनात सिंहाचा वाटा उचलला.राष्ट्रसंतांचे वाड्मय करोडो कानी मुखी नेण्याचा आटोकाट प्रयत्न केला.


श्री,गुरूदेव अध्यात्म गुरुकुल मोझरी जि.अमरावती, ग्रामगिता तत्वज्ञान सक्रीय दर्शन मंदिर,पंढरपुर चालत-बोलत मुक्त आणि युक्त अशा ग्रामगिता विश्व विध्यापिठाची योजना केली. भुवैकुंठाची स्थापना केली.


९२ व्या वर्षी दि.८/६/२००६  ला दादा यांनी नकळत समाधी घेऊन आपली जीवन यात्रा संपवली.अशा निष्काम,त्यागी, तपस्वी, आत्मनुभुवी, क्रान्तिवीर कर्मयोगी संत तुकारामजी दादा गीताचार्य चरणी कोटी कोटी प्रणाम..!

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !